Israel Iran War : कावळ्याने काढून फेकला इस्रायलचा झेंडा ; इराणशी युद्धाधरम्यान जुन्या VIDEO ने वेधले सर्वांच लक्ष (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News marathi : सध्या इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र पेटला आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. इस्रायलने इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ले केले आहेत, तर इराण देखील इस्रायलच्या मुख्य शहरांवर आणि सुरक्षा व्यवस्थांवर हल्ला करत आहे. अशातच या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने आणि रशिया इराणच्या बाजून उभा राहिला आहे. दोन्ही देशांच्या मध्यस्थीने हे युद्ध अधिक भडकले आहे. एककीड दोन्ही देशांना संयम बाळगण्याचेही आवाहन केले जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या व्हिडिओमध्ये एक कावळा इस्रायलचा झेंडा काढून फेकताना दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, झेंडा एका मोठ्या खांबावर फडकवलेला आहे. याचवेळी एक कावळा इस्रायलचा झेंडा चोचीने काढत आहे. कावळा इस्रायलचा झेंडा चोचीने वर काढूतो आणि फेकून दोतो. इस्रायलचा झेंडा हवेत उडून खाली पडतो. सध्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर करत पक्षाला देखील कळत आहे की, आता पुरे झाले आहे. अनेकांनी याला देवाचा संदेश म्हणून संबोधले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका खरा आहे की एआय जनरेटेड आहे याची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“Even the birds have had enough” pic.twitter.com/0OpIevHLu1
— Peacemaker (@peacemaket71) June 19, 2025
यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये कावळा इस्रायलचा झेंडा फाडताना दिसत आहे. याची एक क्लिप एका युजरने शेअर केलेली आहे. एक्सवर @hamada_pal2020 या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअक करण्यात आला आहे. यामध्ये एक कावळा इस्रायलचा झेंडा चोचीने फाडताना दिसत आहे. खालील व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन कावळे देखील इस्रायलचा झेंडा काढून फेकण्याचा प्रयत्न करत आहे.
It is not the first time, nor is it a coincidence, that a crow has brought down the Israeli flag.
Israel will fall, and Palestine will be free pic.twitter.com/zDUkNAXEiw
— ✌️🇵🇸✌️ Mohammed Najjar (@hamada_pal2020) May 1, 2023
सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशा वेळी दुसरीकडे युद्ध अधिक भडकले आहे.