European Commission President Ursula von der Leyen to visit India
नवी दिल्ली: युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरु दौन दिवसांच्या भारत दौर्यावर आहेत. आज (27 फेब्रुवारी) अध्यक्षा भारतात येतील. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अध्यक्षा उर्सुला वॉन डेरे लेयेन यांच्यात चर्चा होईल भारत-युरोपियन युनियन व्यापार परिषदेत त्या पीएम मोदींसह सहभागी होतील. ही परिषद विशेषत: मुक्त व्यापर करारावर (Free Trade Agreement )होणार आहे.
या दौऱ्यात उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्यासोबत युरोपियन युनियनचे 27 सदस्य राष्ट्रांच उच्चे अधिकारी असेलेलला एक प्रितनिधी मंडळ देखील भारतात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दौऱ्याचे नियोजन सुरु होते आणि 21 जानेवारी दावोस येथे याची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि उर्सुला वॉन डेर लेयेन यांना 28 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत संबोधित करतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जर्मनीत बीलेफेल्ड कोर्टाबाहेर गोळीबार; एकाचा मृ्त्यू, चार जण जखमी
तिसरा अधिकृत दौरा
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांचा हा तिसरा अधिकृत भारत दौरा असेल. यापूर्वी त्यांनी एप्रिल 2022 मध्ये द्विपक्षीय भेटीसाठी आणि सप्टेंबर 2023 मध्ये G20 शिखर परिषदेच्या चर्चेसाठी भारतात आल्या होत्या.
या बैठकीत भारत आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापर आमि तंत्रज्ञान परिषदेची दुसरी मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. शिवाय, युरोपियन युनियने विविध आयुक्क आणि भारतीय मंत्री यांच्या द्विपक्षीय बैठकांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
युरोपियन कमिशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन
उर्सुला वॉन डेर लेयेन या युरोपियन कमिशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. त्यांच्या जन्म जर्मनीत 1958 मध्ये झाला असून त्यांनी लंडन स्कूव ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी काही काळ हॅनोव्हर मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणूनही कार्य केले आहे. 1990 मध्ये त्यांनी जर्मन राजकारणात प्रवेश केला. 2005 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मंत्रीपद भूषलले. तेव्हापासून त्या सातत्याने राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे.
भारत आणि युरोपियन युनियनमधील व्यापर संबंध
युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापर भागीदार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि युरोपियन युनियनमधील 2023 मधील व्यापारची एकूण किंमत 129 अब्ज डॉलर इतकी होती. ही संख्या भारताच्या एकूण व्यापारच्या 12.2% इतकी आहे. भारत हा युरोपियन युनियनसाटी नववा सर्वात मोठा भागीदार आहे.
गेल्या दहा वर्षात भारत आणि युरोपियन युनियनमधील वस्तू व्यापारात 90% वाढ जाल असून सध्या भारतात युरोपियन युनियनच्या जवळपास सहा हजार कंपन्या कर्यरत आहेत. तसेच सेवांच्या व्यापारच्या बाबतीतही मोठी वाढ झाली आहे. 2020 मध्ये 31 अब्ज डॉलर असलेला व्यापार 2023 मध्ये 62 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.