पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची घेणार भेट? भारत-रशिया संबंधांना मिळणार नवी दिशा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 2025 मध्ये मे महिन्यात रशियाला भेट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशिया या वर्षी 1941-45चा ग्रेट पॅट्रियटिक वॉरच्या विजयाचा 80 वा वर्धाप दिन 9 मेला साजरा करणार आहे. रशियाच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेमलिनच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यादिवशी रशियात प्रमुख पाहुणे म्हमून उपस्थित राहू शकतात.
मात्र, भारताकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही भेट झाल्यास मोदींचा हा तिसरा रशियन दौरा असणार आहे.
भारत-रशिया संबंध अधिक मजबूत होणार
सध्या भारत आणि रशियाचे संबंध अधिक दृढ असून पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतन यांची मैत्रीही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या वर्षी नरेंद्र मोदींनी दोन वेळा रशियाला भेट दिली होती. एक भेट मास्कोमध्ये आणि दुसरी भेट ब्रिक्स परिषदेदरम्यान झाली. या दरम्यान दोन्ही देशांत संरक्षण, उर्जा आणि व्यापार क्षेत्रांतील भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
ट्रम्प भेटीनंतर पुतिन यांना मोदींची भेट
गेल्या काही दिवसांपूर्वी 13 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींना अमेरिका दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान भारत-अमेरिका संबंधासह दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्धविरामाच्या मुद्दयावरही चर्चा केली. याच वेळी नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य भेटीच्या चर्चांमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवाय, ट्रम्प यांच्या भेटीच्याही अटकळी बांधल्या जात होत्या मात्र, त्यांनी या अटकळ्या फेटाळल्या आहेत.
पुतिन यांचा भारत दौरा
पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिनही भारताला भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे. भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन भारतात येण्याची शक्यता आहे. कोविड आणि जागतिक परिस्थितीमुळे 2021 पासून ही परिषद विस्कळीत झाली होती. यामुळे या परिषदेचे आयोजन लवकरच होणार असून पुतिन भारताला भेट देऊ शकतात.
भारत-रशिया संबंधांचे महत्त्व
भारत आणि रशियमध्ये विशेषाधिकारयुक्त रणनीतिक भागीदारी आहे. दोन्ही देशांनी S-400 क्षेपणास्त्र प्रमाली, उर्जा, अतंराळ, संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रात संबंध प्रस्थापित केले आहेत. यामुळे मोदींचा संभाव्य दौरा केवळ विक्ट्री डे परेडपुरता मर्यादित न राहता भारत-रशिया संबंधांना नवी दिशा मिळू शकते.