जर्मनीत बीलेफेल्ड कोर्टाबाहेर गोळीबार; एकाचा मृ्त्यू, चार जण जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बर्लिन: जर्मनीत एक दुर्घटना घडली आहे. जर्मनीतील बीलेफेल्ड शहरतील न्यालयाबाहेर अचानक गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपार्टनुसार, हा प्रकार न्यायालयात सुरु असलेल्या व्यावसायिक बॉक्र बेसार निमानी यांच्या हत्येच्या सुनावणीदरम्यान घडला. स्थानिक वेळेनुसार, बुधवारी (26 फेब्रुवारी) दुपारी 1.30 वाजता गोळीबाराची घटना घडली. अचानक गोळीबार झाल्याने घटनास्थळी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते.
पोलिसांनी सध्या घटनास्थळी कडक बंदोबस्त केला असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून चार नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. सुरक्षा यंत्रणेणे हल्लेखोराचा शोध घेण्यास सुरु केले आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे.
बॉक्र बेसार निमानी यांच्या हत्येशी संबधित प्रकरण
गोळीबार झाला त्यावेळी व्यावसायिक बॉक बेसार निमानी यांच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या हत्येचा मुख्य आरोपी हुसैन अक्कुर्ट असून याला बेल्जियम पोलिसांच्या मदतीने जुलै 2024 मध्ये ब्रुसेल्समधे अटक करण्यात आली होता. मात्र, दुसरा संशयित अयमान दाऊद किरीत अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेसार निमानी यांची हत्या मार्च 2023 मध्ये जर्मनीतील एका कॅफेत करण्यात आली होती.
गुन्हा अंडरवर्लड्शी संबंधित
हा गुन्हा अंडरवर्लड्शी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. कोर्टातील सुनावणी संपल्यानंतर लोक बाहेर येत असताना हल्ला झाला होता. गोळ्या झाडण्यात आलेल्यांमध्ये आरोपी अक्कुर्टचे वडील आणि भाऊ देखील असू शकतात, मात्र पोलिस प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
कोण होते बॉक्सर बेसार निमानी?
प्रसिद्ध व्यवसायिक बॉक्सर म्हणून बेसार निमानी यांनी ओळखले जात होते. निमानी अल्बानियन बंशाचे होते आणि कोसोवोशी संबंधित होते. 1997 मध्ये कोसोवा युद्धादरम्यान ते जर्मनीत आश्रयासाठी आले, त्यांनी आपल्या बॉक्स कारकिर्दीत 27 पैकी 26 सामने जिंकल आहेत. तसेच IBF युरोपियन वेल्टरवेट आणि आणखी दोन राष्ट्रीय स्पर्धी त्यांनी जिंकल्या आहेत.
टमार्च 2023 मध्ये बीलेफेल्ड शहरात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. एका किंवा अधिक हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हत्येमागे मोठे गुन्हेगारी टोळ्यांचे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.