Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Iran ties: ‘इराण युद्ध जिंकेल आणि भारत…’ RAWच्या माजी प्रमुखांचा खळबळजनक दावा; दोन्ही देशांमधील संबंधांवर टाकला प्रकाश

India-Iran Relations: मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, 'रॉ'चे माजी प्रमुख अमरजित सिंग दुलात यांनी इराणसोबतचे भारताचे दीर्घकालीन संबंध आणि विजयाची शक्यता यांचा उल्लेख करत एक निवेदन जारी केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 19, 2026 | 04:16 PM
explainer raw chief as dulat on india iran relations victory claim chabahar port

explainer raw chief as dulat on india iran relations victory claim chabahar port

Follow Us
Follow Us:
  • RAW च्या माजी प्रमुखांचे भाकीत
  • ऊर्जा संकट आणि भारत
  • चाबहार आणि धोरणात्मक युती

AS Dulat on Iran Israel War : मध्यपूर्वेतील रणसंग्राम आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे केवळ दोन देश नाही तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था पणाला लागली आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका (US-Israel Iran War) यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ (RAW) चे माजी प्रमुख अमरजित सिंग दुलात यांनी एक असे विधान केले आहे, ज्याने राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

इराण जिंकणार? ए. एस. दुलात यांचा दावा काय?

एएनआय (ANI) ला दिलेल्या मुलाखतीत दुलात यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्ही (भारत) नेहमीच इराणसोबत आहोत आणि आमचे संबंध खूप जुने आहेत.” सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी या युद्धात इराण विजयी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. जरी अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्ता इराणच्या विरोधात असल्या, तरी इराणची भौगोलिक स्थिती आणि त्याची लढाऊ क्षमता पाहता त्यांना हरवणे सोपे नाही, असे संकेत दुलात यांनी दिले आहेत. मात्र, त्यांनी या युद्धाला ‘दुर्दैवी’ संबोधत जागतिक शांततेसाठी ते धोकादायक असल्याचेही नमूद केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध सुरु होणार? इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक अहवाल आला समोर

भारत-इराण संबंधांचा इतिहास: ७५ वर्षांची साथ

भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १९५० च्या दशकापासून दोन्ही देशांनी एकमेकांचा आदर केला आहे. १९७९ मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणचे अमेरिकेशी संबंध बिघडले, पण भारताने अत्यंत संतुलित भूमिका घेत इराणशी मैत्री कायम ठेवली. इराण हा भारतासाठी केवळ तेलाचा पुरवठादार नाही, तर तो मध्य आशियातील भारताचा सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे. पाश्चात्य देशांच्या दबावाखाली असतानाही भारताने इराणकडून तेल आयात करणे पूर्णपणे थांबवले नाही, हे या मैत्रीचेच प्रतीक आहे.

चाबहार बंदर: पाकिस्तानला दिलेली ‘चेकमेट’

भारत आणि इराणमधील संबंधांचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे ‘चाबहार बंदर’. पाकिस्तानने भारताला अफगाणिस्तानकडे जाण्यासाठी रस्ता नाकारल्याने, भारताने इराणच्या चाबहार बंदरात गुंतवणूक केली. हे बंदर भारताला पाकिस्तानला टाळून थेट मध्य आशिया आणि रशियाशी जोडते. याच बंदरामुळे ‘आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर’ (INSTC) यशस्वी होत आहे. जर इराणवर संकट आले, तर भारताचा हा महत्त्वाकांक्षी व्यापारी मार्ग धोक्यात येऊ शकतो, म्हणूनच भारत इराणमध्ये स्थिरता पाहण्यास इच्छुक आहे.

🎙️🤝 ‘We were always with #Iran…,’ Former #RAW chief #AmarjitSinghDulat on #US–#Israel‘s war with Iran 🇮🇳📜 https://t.co/J2C24SdzMf pic.twitter.com/vWGAc38fMN — Economic Times (@EconomicTimes) March 19, 2026

credit – social media and Twitter

ऊर्जा सुरक्षा आणि भारताची चिंता

भारत आपली ८० टक्क्यांहून अधिक तेलाची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. मध्यपूर्वेतील युद्धामुळे जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली किंवा इराणच्या तेल विहिरींना लक्ष्य केले गेले, तर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडतील. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल महाग होईलच, पण महागाईचा भडकाही उडेल. दुलात यांच्या मते, भारताने आपले हित लक्षात घेऊन इराणशी असलेले संबंध अधिक घट्ट करणे गरजेचे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : अधिक भयावह युद्धपरिणाम! इराणचा सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर भीषण हल्ला; इंधन दरवाढ पेटवणार महागाईची आग

निष्कर्ष: भारताची कसरत

एककीडे इस्रायल भारताचा संरक्षण भागीदार आहे, तर दुसरीकडे इराण हा ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा आहे. अशा वेळी भारताला ‘तटस्थ’ राहून आपली राष्ट्रीय सुरक्षा जपण्याचे मोठे आव्हान आहे. ‘रॉ’च्या माजी प्रमुखांचे हे विधान भारताच्या परराष्ट्र धोरणात इराणचे महत्त्व अधोरेखित करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ए. एस. दुलात यांनी इराणबद्दल काय दावा केला आहे?

    Ans: रॉ च्या माजी प्रमुखांनी म्हटले आहे की, भारत आणि इराणचे संबंध खूप जुने आहेत आणि सध्याच्या संघर्षात इराण विजयी होऊ शकतो.

  • Que: चाबहार बंदर भारतासाठी का महत्त्वाचे आहे?

    Ans: हे बंदर भारताला पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत थेट व्यापारी मार्ग उपलब्ध करून देते.

  • Que: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे भारतात महागाई आणि ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती आहे.

Web Title: Explainer raw chief as dulat on india iran relations victory claim chabahar port

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • iran
  • RAW
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
2

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
3

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा
4

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.