External Affairs Minister S. Jaishankar on UK visit
नवी दिल्ली: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मंगळवारी (04 मार्च) युनायटेड किंग्डम आणि आर्यलॅंंडच्या सहा दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंधावर मजबूत करणाऱ्यावर चर्चा होईल. यापूर्वी एस. जयशंकर लंडनमध्ये त्यांचे ब्रिटीश समकक्ष परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे एस. जयशंकर यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा युक्रेनवरुन अमेरिका आणि युरोपमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामुळे या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
झेलेन्स्की ट्रम्प वादानंतर एस. जयशंकर यांचा दौरा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्कीं यांच्या फेब्रुवारी 28 रोजी झालेल्या बैठकीत तीव्र वाद झाला. या जोरदार वादविवादानंतचर एस. जयशंकर यांचा हा दौरा होणार आहे. सध्या झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातीव वादाची चर्चा जगभर सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये युरोपियन नेत्यांनी यूक्रेनला पाठिंबा देण्यासाठी एक बैठक घेतली होती. यादरम्यान एस. जयशंकर यांचा ब्रिटन दौरा महत्त्वाचा ठरणार असून या दौऱ्यात रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा होणार का हे पाहणे महत्त्वापूर्ण असेल.

भारताची रशिय-युक्रेन युद्धावर भूमिका
भारताने सुरुवातीपासूनच रशिया-युक्रेन युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने कोणत्याही एकाच देशाचे समर्थन केलेले नाही. मात्र, अमेरिकेने आपली भूमिका बदललेली आहे. यामुळे अमेरिकेच्या या बदलत्या भूमिकेत आपलीही भूमिका बदलली आहे. भारत यासाठी संघर्षात असलेले दोन पक्ष असे शब्द वापरत आहे.
भारत-ब्रिटन मुक्त व्यापर करार
युक्रेन शांतता चर्चेशिवाय, या दौऱ्यादरम्यान भारत-यूके मुक्त व्यापर करारावर डेव्हिड लॅमी आणि एस. जयशंकर यांच्यात चर्चा होईल. गेल्या महिन्यात ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि दोन्ही देशांनी पुन्हा कराराबाबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. भारत आणि ब्रिटनमधील वाढते संबंध पाहाता या बैठकीत संरक्षण, व्यापार, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक आदान-प्रदान यांसारख्या क्षेत्रांमध्ये अधिक बळकट होण्यावर भर देण्यात येईल.