फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
व्हिएन्ना: अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्टचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेल. ती कोणत्याही स्टेजवर असली की तिच्या चाहत्यांची तिला ऐकण्यासाठी गर्दी करतात. टेलर स्विफ्टच्या फॅन फॉलोइंगमध्ये जगभरातील लोकांचा समावेश आहे. पण सध्या तीचे कॉन्सर्ट रद्द करण्यात आले आहेत. टेलर स्विफ्ट आज गुरूवारी(8 ऑगस्ट) आणि शनिवार, 10 ऑगस्ट दरम्यान व्हिएन्नामध्ये तीन शो करणार होती. पण तीचे हे तीनही शो रद्द करण्यात आले आहे. यामगचे कारण सांगताना ऑस्ट्रियाचे अधिकारी म्हणाले की, व्हिएन्ना परिसरात दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या संबंधात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
ऑस्ट्रियातील स्विफ्टच्या कॉन्सर्टचे मॅनेजर बॅराकुडा म्युझिकच्या म्हणण्यानुसार, त्या तारखा बुधवारी रद्द करण्यात आल्या, एका मीडिया रिपोर्टनुसार, “अर्न्स्ट हॅपल स्टेडियमवर नियोजित दहशतवादी हल्ल्याची सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिल्ल्यानंतर, कॉन्सर्टसाठी आलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी कॉन्सर्ट रद्द करण्यात आले आहे “. असे बॅराकुडा म्युझिकने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
चाहते निराश
तीन हाय प्रोफाईल शो रद्द करणे अधिकाऱ्यांसाठी सोपा निर्णय नव्हता कारण स्विफ्टच्या शोमुळे तिचे लाखो चाहते नाराज झाले आहेत. टेलरचे शो रद्द केल्यामुळे चाहते हादरले आणि निराश झाले आहेत, जे शोसाठी व्हिएन्नाला गेले होते. एका फॅनने म्हणले की, मीव्हेनेसा स्झोम्बाथेली, 24, आयर्लंडहून व्हिएन्नात खास तिच्या कॉन्सर्टसाठी आले होते. पहिल्यांदाच मी कॉन्सर्टसाठी आलो होतो असेही एकाने म्हणले आहे. आणखी एक म्हणाला की, मला रडायला ही येत आहे आणि रागही येतोय.
२ संशयितांना अटक
स्विफ्टच्या अधिकृत वेबसाइटनेही कॉन्सर्ट रद्द झाल्याची माहिती दिली आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना पोलिसांनी सांगितले की, 19 वर्षीय ऑस्ट्रियन नागरिक, ज्याला ते इस्लामिक स्टेटचे समर्थक मानतात, त्याला बुधवारी सकाळी लोअर ऑस्ट्रियातील टर्निट्झ येथे अटक करण्यात आली, तर नंतर व्हिएन्ना येथे आणखी एकाला अटक करण्यात आली. टर्निट्झ येथील संशयितांच्या घरी स्फोटके सापडली असल्याचा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.