
Farmers burn straw between 4 and 6 pm to avoid local administration and satellite monitoring
Farmers dodging NASA satellites stubble burning 2025 : दरवर्षी हिवाळा सुरू झाला की उत्तर भारतात, विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये पेंढा जाळण्याचे सत्र सुरू होते. आजवर आपण ऐकलं होतं की सरकार उपग्रहाद्वारे लक्ष ठेवून आहे आणि आग दिसली की शेतकऱ्यांवर (Farmers) कारवाई केली जाते. पण आता भारतीय शेतकऱ्यांनी या आधुनिक उपग्रहांच्या देखरेखीलाच ‘गुंगारा’ देण्यास सुरुवात केली आहे. नासाच्या (NASA) शास्त्रज्ञांनाही हे कोडं पडलं होतं की, उपग्रहाच्या डेटामध्ये आगीच्या घटना कमी दिसत असूनही दिल्लीतील प्रदूषण का वाढत आहे? यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
नासाचे उपग्रह, प्रामुख्याने MODIS, दुपारी १ ते २ च्या दरम्यान भारतीय भूभागावरून जातात आणि उष्णता शोधून आगीच्या नोंदी करतात. शेतकऱ्यांनी ही वेळ अचूक ओळखली आहे. कारवाई आणि दंड टाळण्यासाठी त्यांनी आता आपली पद्धत बदलली आहे. शेतकरी दुपारी पेंढा न जाळता, उपग्रह गेल्यावर म्हणजे संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान शेतात आग लावत आहेत.
जेव्हा नासाच्या डेटा आणि जमिनीवरील प्रदूषणाच्या पातळीत मोठी तफावत दिसू लागली, तेव्हा शास्त्रज्ञांनी इतर मार्गांनी तपास सुरू केला. दक्षिण कोरियाचा GEO-KOMPSAT-2A हा उपग्रह दर १० मिनिटांनी पृथ्वीचे निरीक्षण करतो. या उपग्रहाच्या डेटाचे विश्लेषण केल्यावर शास्त्रज्ञ हिरेन जेठवा आणि त्यांच्या टीमला धक्कादायक माहिती मिळाली. २०२४ मध्ये पेंढा जाळण्याचा सर्वाधिक कल संध्याकाळी ५ च्या सुमारास होता, जो २०२० मध्ये दुपारी १:३० वाजता असायचा. याचा अर्थ असा की, शेतात आग लागलेली असते, धूर हवेत पसरत असतो, पण नासाचे उपग्रह जेव्हा वरून पाहतात तेव्हा त्यांना काहीच दिसत नाही. हा एक प्रकारचा ‘टेक्नॉलॉजिकल गेम’ आहे जो स्थानिक कारवाई टाळण्यासाठी खेळला जात आहे.
Farmers are dodging satellites now? 😭 A new ISRO study found that farmers in Punjab and Haryana are now burning crop stubble later in the day after 4:30 pm instead of the usual early afternoon. This timing change helps them avoid being spotted by NASA’s monitoring satellites,… pic.twitter.com/CJlqpdXj9I — Sanket Savani (@Marswalkerr) December 5, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी
शेतकऱ्यांनी वेळ बदलली असली तरी निसर्गाचे नियम बदललेले नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते, संध्याकाळी पेंढा जाळणे हे दुपारपेक्षा कित्येक पटीने जास्त घातक आहे. रात्रीच्या वेळी हवेची उंची कमी होते (Inversion layer) आणि वारे मंदावतात. यामुळे संध्याकाळी निघालेला धूर आकाशात उंच न जाता जमिनीजवळच साचून राहतो. डिसेंबर २०२५ मध्ये दिल्लीतील अनेक भागांत ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (AQI) ५०० च्या पार गेला आहे. शाळा बंद कराव्या लागल्या आहेत आणि बांधकाम कामांवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ पेंढाच नाही, तर वाहने, फटाके आणि कारखान्यांचा धूरही यात मिसळला आहे, ज्यामुळे संपूर्ण उत्तर भारत एका ‘गॅस चेंबर’मध्ये रूपांतरित झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Politics : महासत्तेच्या अभेद्यकिल्याखाली केली जातेय गुपितांची पायाभरणी; व्हाईट हाऊसकडून मिळाले ‘हे’ 3 गूढ संकेत
तज्ज्ञांच्या मते, शेतकरी नासाला जाणीवपूर्वक फसवण्याच्या उद्देशाने हे करत नाहीत, तर ते स्थानिक प्रशासनाच्या दंडाला आणि कारवाईला घाबरत आहेत. पेंढा व्यवस्थापनासाठी योग्य पर्याय किंवा यंत्रसामग्री वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकडे आग लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, उपग्रहाला चकवण्याच्या या पद्धतीमुळे प्रदूषणाविरुद्धचा लढा अधिक कठीण झाला आहे. अचूक डेटा मिळत नसल्याने सरकारला योग्य नियोजन करणे अशक्य होत आहे.
Ans: कारण नासाचे उपग्रह दुपारी डेटा घेतात, तर शेतकऱ्यांनी आता कारवाई टाळण्यासाठी संध्याकाळी पेंढा जाळण्यास सुरुवात केली आहे.
Ans: स्थानिक प्रशासन आणि उपग्रहाद्वारे होणारी देखरेख टाळण्यासाठी शेतकरी संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान पेंढा जाळतात.
Ans: रात्री वारे मंद असतात आणि हवेचा थर जमिनीजवळ असतो, ज्यामुळे धूर बाहेर न जाता जमिनीलगत साचून राहतो आणि प्रदूषण वाढते.