
Maharashtra breaking News Marathi
04 Feb 2026 10:50 AM (IST)
लिबियातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. लिबियाचे माजी हुकूमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ-अल-इस्लाम गद्दाफी याची हत्या करण्यात आली आहे. इस्लाम यांच्या टीमचे सल्लागार अब्दुल्लाह अस्मान अब्दुर्रहमनी यांनी याची पुष्टी केली आहे. या घटनेने लीबियाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
04 Feb 2026 10:40 AM (IST)
मागील काही दिवसांपीसून इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, चंद्रिका कॅमेऱ्यासमोर रडताना आणि तिचा पती युगम गेरा यांच्यावर फसवणूक केल्याचे गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. चंद्रिकाने तिच्या पतीचे एका महिलेसोबतचे फोटो आणि चॅट्स सोशल मिडियावर उघड केल्या. सोशल मिडियावर तिचे दोन व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत ज्यामधील एका व्हिडिओत चंद्रिका खूप रडताना दिसत आहे.
04 Feb 2026 10:30 AM (IST)
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेमुळे वाढती वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारला खर्चावर लगाम लावावा लागला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थमंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
04 Feb 2026 10:20 AM (IST)
अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. एका पीडित महिलेने अकोला सिस्टी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकरण उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे.
04 Feb 2026 10:08 AM (IST)
दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणात बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव यांच्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने त्यांना आज, ४ फेब्रुवारीपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेत्याचे वर्तन निंदनीय असल्याचे सांगत न्यायालयाने म्हटले आहे की वारंवार आश्वासन देऊनही पैसे न देणे ही न्यायालयीन प्रक्रियेची थट्टा आहे.
04 Feb 2026 09:36 AM (IST)
कोल्हापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होताच, कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. ७ फेब्रुवारीला मतदान आणि ९ फेब्रुवारीला मतमोजणी झाल्यानंतर, १० फेब्रुवारीपासून 'गोकुळ' निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धामधुमीतून मोकळे झाल्यानंतर प्रशासन आता सहकार क्षेत्रातील या सर्वात मोठ्या निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, पुढील आठवड्यात अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
04 Feb 2026 09:24 AM (IST)
नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी नावे निश्चित करताना झालेल्या बदलांमुळे सुनील केदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेश पातळीवरून ठरलेली नावे ऐनवेळी बदलण्यात आल्याने त्यांनी हा तडकाफडकी निर्णय घेतला.महापौर पदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र "आम्हाला सत्तेत कुणाचीही गरज नाही" असे ठाम वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. या विधानामुळे आणि उमेदवारांच्या निवडीमुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.
04 Feb 2026 09:14 AM (IST)
काल मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास खंडाळा घाटात झालेल्या टँकर अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई कॉरिडॉर (मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग), आडोशी बोगदा (Adoshi Tunnel) जवळ एक केमिकल टँकर पलटी झाला असून, त्यातून ज्वालाग्रही गॅसची (Inflammable Gas) मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे.गॅस गळतीमुळे आगीचा मोठा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे अशा दोन्ही बाजूंच्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत गॅस गळती पूर्णपणे थांबवून रस्ता सुरक्षित केला जात नाही, तोपर्यंत एक्सप्रेसवेवरून प्रवास करणे टाळावे. प्रवाशांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा (Old Highway) वापर करावा किंवा शक्य असल्यास आजचा प्रवास पुढे ढकलावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. अशा काही महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, लाडकी बहीण योजनेच्या तीन महिन्यांचा 4500 रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातून देण्यात आली.