
Khaleda Zia Health Update
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
खालिदा जिया गेल्या अनेक वर्षांपासून किडनी, डायबेटिज, संधिताव, आणि डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. आलमगीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात होते. सध्या त्यांच्यावर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीयतज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत. खालिदा जिया यांच्या छातीत या सर्व आजारांमुले संसर्ग झाला असून त्यांची प्रकृती बिकट होत चालली आहे. त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी एका खासगी रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांना कोरोनरी केअर युनिट (CCU) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
माध्यमांच्या रिपोर्टनुसार, BNP पक्षाच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट अहमद आझ यांनी खालिदा जिया यांची प्रकृती बिकट असल्याचे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी समर्थकांना आणि देशातील नागरिकांना त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच BNP चे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी देखील खालिदाय झिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून पुढील अपडेट लवकरच देण्यात येतील. आलमगीर यांनी म्हटले आहे की, खालिदा खूप आजारी आहेत. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञ त्यांच्यावर उपातर करत आहे, परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणत्याही सुधारणा नाहीत. सध्या त्यांना आपल्या प्रार्थनांची आवश्यकता आहे.
३० मे १९८१ मध्ये खालिदा जिया यांचे पती रहमान यांची हत्या करण्यात आली होती. त्यांनी लष्करी बंडादरम्यान गोळीबार करण्यात आला होता. झियाउर रहमान बांगलादेशाच्या सैन्यात होते. पतीच्या मृत्यूनंतर BNP पक्षाचे विभाजन आणि खालिदा जिया यांच्या हातात सुत्रे आली.
खालिदा जिया या शेख हसीनांच्या (Sheikh Hasina) विरोधक मानल्या जातात. १९८० मध्ये बांगलादेश लष्करी राजवटीच्या नेतृत्त्वाखाली होता. या वेळी दोघी महिला नेत्या एकत्र आल्या. त्यांनी लष्कराविरोधात बंड पुकारला होता. १९९० मध्ये बांगलादेशात लोकशाही स्थापन झाली. तेव्हा १९९१ च्या निवडणूकीत खालिदा जिया यांचा विजय झाला आणि त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. तेव्हापासून हसीना आणि खालिदा यांच्यात कट्टर राजकीय स्पर्धा सुरु झाली होती. त्यावेळी त्यांच्या या लढाईला लोकांनी बेगमांची लढाई असे नाव दिले होते.