Former Hamas official Yahya Sinwar's wife absconded from Gaza Israeli news agency claims she married again in Turkey
सध्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदीची चर्चा सुरु आहे. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ हे युद्ध सुरु होत. या युद्धादरम्यान इस्रायलने हमासच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या केली. यापैकी याह्या सिनावार या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्याची देखील हत्या करण्यात आली होती. दरम्यान त्याच्या कुटुंबासंदर्भात एक माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, याह्या सिनवारची विधवा पत्नी बनावट पासपोर्ट वापरुन गाझातून फरार झाली आहे. या घटनेने हमासमध्ये मोठी खळबळ उडाली असून ती तुर्कीमध्ये पळून गेल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर याह्या सिनवारच्या पत्नीने तुर्कीमध्ये दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रालची वृत्तसंस्था Ynet ने हा दावा केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवाय अद्याप हमासकडून किंवा याह्या सिवारच्या कुटुंबाकजून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे या घटनेला अधिकच जोर आला आहे.
Ynet च्या अहवालानुसार, याह्या सिनावरच्या बायकोचे नाव समर मोहम्मद अबू जमारने आहे. हमासच्या याह्या सिनवारशी २०११ मध्ये समर मोहम्मद अबू जमारचे लग्न झाले होते. परंतु याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर ती गाझातून गायब झाली आहे. अहवालानुसार, समर मोहम्मद अबू जमार आपल्या मुलांना घेऊन तुर्कीमध्ये गेली असल्याचे म्हटले आहे.
BREAKING: Yahya Sinwar’s wife fled to Turkey using a fake passport belonging to another woman from Gaza and remarried there to another man, with the help of Hamas’ bureau in Qatar and a large amount of money.
She moved on quickly, didn’t she? pic.twitter.com/mvFDgb6eiI
— Vivid.🇮🇱 (@VividProwess) July 23, 2025
वृत्तसंस्थेने अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, अबू जमार तिच्या मुलांसह तुर्कीला गेली आहे. परंतु गाझातून बाहेर पडण्यासाठी खूप पैसा आणि लोकांची मदतीची गरज आहे. गाझातील सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. अशा परिस्थिती अबू जमार बनावट पासपोर्ट वापरुन रफा सीमेवरुन इजिप्त मार्गे तुर्कीला गेली असल्याचा दावा इस्रायलच्या Ynet वृत्तसंस्थेने केला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये इस्रायली हल्ल्यात हमासच्या प्रमुख याह्या सिनवारची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अबू जमारने गाझातून पळ काढला. Ynetच्या अहवालानुसार, हमाने प्रमुखी नेत्यांना हल्ल्यापूर्वीच गाझातून बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना देखील गाझातून बाहेर काढले जात होते. याच वेळी बनावट कागदपत्रांच्या मदतीने याह्या सिनावरी पत्नी गाझातून फरार झाली असावी.
सध्या याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ मोहम्मद नजवा याने हमासची कमान हाती घेतली आहे. परंतु नजवा देखील गाझामध्ये नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्याने युद्धापूर्वीच गाझा सोडली होती असा दावा आहे. इस्रायलने देखील याची पुष्टी केल्याचा दावा केला आहे.