अमेरिकेच्या मिशिगनध्ये लोकांवर प्राणघातक हल्ला; ११ जणांवर चाकूचा वार, ६ गंभीर जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेच्या मिशिगन येथील एका वॉलमार्टमध्ये लोकांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच अग्निशमन दल आणि बचाव पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाय एका संशयिताला पकडण्यात आले आहे. वॉलमार्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका संशसियाताला पोलिसांच्या मदतीने पकडले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरु आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप समोर आलेली नाही. तसेच पोलिसांनी देखील आरोपीची ओळख स्पष्ट केलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अचानक हल्ला केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यामध्ये जखमी झालेल्यांना मिशिनगनच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिशिगनच्या प्रवक्त्या मेगन ब्राउन यांनी सहाजणांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच थोड्या वेळात इतर अपडेटही दिले जातील असे म्हटले आहे.
पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त केला आहे. सध्या मिशिगनचे राज्य पोलिस आणि स्थानिक शेरीफचे कार्यालया या घटनेची संयुक्तपणे चौकशी करत आहे. लोकांना परिसरापासून दूर राहण्याची आणि घरात सुरक्षित राहम्याची विनंती केली आहे.
गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांनी, या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी त्यांचे कार्यालया या घटनेच्या प्रकरणाशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटे. त्यांनी या क्रूर हल्ल्यात जखमी झालेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहे. वॉलमार्ट कॉर्पोरेट प्रवक्ते यांनी देखील पोलिसांना सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे. सध्या या घटनेने अमेरकेत मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या अमेरिकन नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील चाकूने हल्ल्याच्या अमेरिकेत अनेक घटवा घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. गेल्या काही काळात अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या फिलाडेल्फियात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये ३१ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.