'त्यांनी कायद्याचे उल्लघंन केले आहे' ; कमला हॅरिसवर ट्रम्प यांचा गंभीर आरोप, केला संताप व्यक्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. आपल्या विरोधकांवर तर सतत हल्ला चढवत असतात. त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांनी कमला हॅरिसवर गंभीर आरोप केले आहे. २०२४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान हॅरिस यांनी पैसे देऊन समर्थन मिळवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान कमला हॅरिसने गायिका बियॉन्से, टीव्ही स्टार ओप्राम विन्फ्रे आणि सामाजिक कार्यकर्ते अल शार्प्टन या व्यक्तींना समर्थनासाठी पैसे दिले आहे. त्यांनी कमला हॅरिस यांच्या या कृतीला गंभीर आणि कायदेशीर उल्लंघन मानले आहे. तसेच याविरोधात चौकशीची देखील मागणी केली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर कमला हॅरिस यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “नेत्यांनी प्रचारासाठी पाठिंहा मिळवण्यासाठी पैसे देण्यास सुरुवात केली आहे, मात्र हे अमेरिकेच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यांनी आरोप केला आहे की, कमला हॅरिसने आणि इतरांनी प्रचाराच्या समर्थनार्थ लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. हे अमेरिकेच्या निवडणूक कायद्यांच्या विरुद्ध आहे. यावर चौकशी दाखल करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या इतिहासातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षपेक्षा त्यांच्या पहिल्या कारकिर्दीचे शेवटचे सहा महिने अतिशय चांगले होते. तर उजव्या विचारसणीचे डेमोक्रॅट हे लवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय ट्रम्प यांना एपस्टाईन प्रकरणावर विचारण्यात आले असता, त्यांनी याला डेमोक्रॅटिक पक्षाची लोकांना त्यांच्याविरोधात करण्याची चाल म्हटले आहे. तसेच हा एक रशियन कटासारखा एक घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांना जेफ्री एपस्टाइन आणि घिसलेन मॅक्सवेल यांची ग्रॅंड ज्युरी स्टेटमेंट सार्वजनिक करण्याती विनंती केली आहे. ही मागणी त्यांच्यावरील वाढता सार्वजनिक दबाव आणि प्रकरणाशी त्यांच्या कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यासाठी करम्यात आली आहे.