Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्त्रायल राजकारणात खळबळ; माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांचा संसद सदस्यत्वाचा राजीनामा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंच्या अति उजव्या सरकारच्या धोरणांना विरोध करणारे माजी इस्रायली संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 02, 2025 | 10:42 AM
इस्त्रायल राजकारणात खळबळ; माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांचा संसद सदस्यत्वाचा राजीनामा

इस्त्रायल राजकारणात खळबळ; माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांचा संसद सदस्यत्वाचा राजीनामा

Follow Us
Follow Us:

जेरुसलेम: माजी इस्रायली संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. गॅलंट यांनी अनेक वेळा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या अति उजव्या सरकारच्या धोरणांना विरोध केला होता. त्यामुळे त्यांना नोव्हेंबरमध्ये संरक्षणमंत्री पदावरून हटवण्यात आले होते. सध्या त्यांच्या या निर्णयाने इस्त्रायल राजकारणात खळबळ उडाली असून जगभर सर्वत्र चर्चा होत आहे.

गॅलंट यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा करताना म्हटले की, “जसे युद्धभूमीवर निर्णय घ्यावे लागतात, तसेच सार्वजनिक सेवेतही काही क्षण येतात, जेव्हा थांबावे लागते, परिस्थितीचे मूल्यांकन करावे लागते आणि योग्य दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो.” त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण जगभरात खळबळ उडवून दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia Ukraine War: युद्धादरम्यान रशियाने लागू केला टॅक्स; पर्यटकांच्या खिशावर होणार परिणाम?

नेतान्याहूंच्या अनेक धोरणांवर गॅलट यांची टीका

गॅलंट यांनी अनेक मुद्द्यांवर नेतान्याहूंच्या धोरणांवर टीका केली होती. विशेषतः, अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू लोकांना लष्करी सेवेपासून दिल्या जाणाऱ्या सूटविषयी त्यांनी विरोध दर्शवला होता. मार्च 2023 मध्ये, गॅलंट यांनी नेतान्याहू सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारकपातीच्या वादग्रस्त प्रस्तावाला विराम देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले, मात्र त्यांची ही कारवाई जनतेच्या तीव्र संतापाचा कारण ठरली. देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली, यामुळे नेतान्याहूंना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

गॅलंट विरोधात अटक वॉरंट

याशिवाय, गॅलंट आणि नेतान्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने गाझा संघर्षातील कथित युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांबद्दल अटक वॉरंट जारी केले आहे. या आरोपांवर इस्रायलने आक्षेप नोंदवला आहे आणि त्यांचा विरोध दर्शवला आहे.गॅलंट यांच्या निवृत्तीने इस्रायली राजकारणात मोठा धक्का बसला आहे. योव गॅलंट देशाच्या संरक्षण धोरणांवरील भूमिका अनेकदा प्रामाणिक व ठोस मानली जात असे.

गॅलंट यांच्या समर्थकांमध्ये असंतोषाची भावना

तसेच गॅलंट यांनी नेतान्याहू सरकारच्या अनेक धोरणांना कडाडून विरोध केला होता, ज्यामुळे ते सार्वजनिक जीवनात एक महत्त्वाचा आवाज ठरले होते. गॅलंट यांच्या निवृत्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोषाची भावना दिसून येत आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट एका वादग्रस्त आणि संघर्षमय कालखंडात होत आहे. नेतान्याहू सरकारच्या अति उजव्या धोरणांवर आणि देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर गॅलंट यांची भूमिका कायम चर्चेत राहणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तान न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना सुनावली 34 वर्षांची शिक्षा; ‘या’ प्रकरणात जाणार तुरुंगात

Web Title: Former israeli defence minister yoav gallant resigns from parliament nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • defence minister
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
1

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL
2

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य
3

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?
4

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.