Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Crisis : निवडणुकीपूर्वी नेपाळमध्ये वादळी राजकारण; ओलींच्या नव्या ‘सुरक्षा पथका’मुळे देश अस्थिर अन् युद्धसदृश वातावरण

KP Sharma Oli : नेपाळच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने शुक्रवारी (दि.5 मार्च 2026) होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारला सैन्य तैनात करण्याची शिफारस केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 23, 2025 | 03:30 PM
Former Nepal Prime Minister KP Sharma Oli formed his own army risking civil war before elections

Former Nepal Prime Minister KP Sharma Oli formed his own army risking civil war before elections

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पक्षासाठी स्वतंत्र सुरक्षा युनिट स्थापन केल्याची घोषणा.
  • नेपाळच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने निवडणुकीदरम्यान सैन्य तैनात करण्याची शिफारस.
  • राजकीय तणाव वाढत असून गृहयुद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nepal former PM Oli forms private army : नेपाळच्या (Nepal) आगामी सार्वत्रिक निवडणुकीला (दि.5 मार्च 2026) अवघे काही महिने बाकी असताना, देशात राजकीय वातावरण चिघळत आहे. माजी पंतप्रधान आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ–युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (CPN-UML) चे प्रमुख के.पी. शर्मा ओली(KP Sharma Oli ) यांनी पक्षाच्या अंतर्गत नवीन सुरक्षा युनिट स्थापन केल्याची घोषणा केल्यानंतर नेपाळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ओली यांनी दावा केला की, देशातील नागरिक, व्यावसायिक आणि माध्यमांना पुरेशी सुरक्षा देण्यात विद्यमान सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच ‘राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा’ या नावाने पर्यायी सुरक्षा पथक उभारावे लागले, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक तणाव वाढला : राष्ट्रीय सुरक्षा परिषद आक्रमक

देशातील वाढत्या अस्थिरतेचा विचार करून नेपाळच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने शुक्रवारी केंद्र सरकारला निवडणुकांच्या काळात राष्ट्रीय सेना तैनात करण्याची शिफारस केली आहे. परिषद सदस्य आणि संरक्षण सचिव सुमन राज अर्याल यांच्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुका “मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय” वातावरणात पार पाडण्यासाठी ही तैनाती आवश्यक आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने निवडणूक सुरक्षेसाठी तयार केलेला एकात्मिक सुरक्षा आराखडा देशातील सर्व ७७ जिल्ह्यांना पाठवण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ

प्रश्न गंभीर: ओली समांतर सेना तयार करत आहेत का?

ओलींच्या या निर्णयामुळे अनेक संशय उपस्थित झाले आहेत. दक्षिण नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांत सीपीएन-यूएमएल कार्यकर्ते आणि युवक निदर्शकांमध्ये झालेल्या तीव्र संघर्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, जर हा सुरक्षा दल राजकीय दबावासाठी वापरला गेला किंवा सरकारच्या सैन्याशी भिडला, तर नेपाळमध्ये पुन्हा गृहयुद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो. काठमांडूमध्ये सीपीएन-यूएमएलच्या रॅलीदरम्यान जनरेशन-Z गट आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धडक हेच संकेत देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश

 काय पुढे?

एकीकडे सरकार राष्ट्रीय सैन्य उतरवण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे सर्वात मोठा विरोधी पक्ष स्वतःचे सुरक्षा ताफे मैदानात उतरवत आहे.
यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे नेपाळ पुन्हा एकदा राजकीय संघर्षाच्या विळख्यात अडकणार का? आणि ओली खरोखरीच स्वतःची “खाजगी सेना” उभारत आहेत का?येणारे काही महिने नेपाळच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: केपी शर्मा ओली यांनी खरोखर स्वतंत्र सैन्य स्थापन केले आहे का?

    Ans: त्यांनी “राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा” नावाने सुरक्षा युनिट स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

  • Que: नेपाळमध्ये सैन्य तैनात का केले जात आहे?

    Ans: आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे सुरक्षीत आणि निष्पक्ष आयोजन सुनिश्चित करण्यासाठी.

  • Que: नेपाळमध्ये गृहयुद्धाचा धोका आहे का?

    Ans: विश्लेषकांच्या मते, परिस्थिती तणावपूर्ण असून धोका पूर्णपणे नाकारता येत नाही.

Web Title: Former nepal prime minister kp sharma oli formed his own army risking civil war before elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • KP Sharma Oli
  • nepal
  • Nepal News
  • Nepal Violence

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! Gen Z आणि UML च्या कार्यकत्यांमध्ये वाद, कर्फ्यू लागू
1

नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! Gen Z आणि UML च्या कार्यकत्यांमध्ये वाद, कर्फ्यू लागू

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…
2

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.