French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Rafale jet downing fake news : पाकिस्तानच्या (Pakistan) जिओ न्यूज आणि हमीद मीर यांनी पसरवलेल्या कथित “युद्ध विजयाच्या” व्हायरल बातमीवर फ्रेंच नौदलाने अधिकृत प्रतिक्रिया देत तिला पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारी (Fake & Manipulated News) ठरवले आहे. या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानचा प्रचार पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि पाकिस्तानच्या न्यूज चॅनेल्सवर एक दावा जोरात व्हायरल झाला होता. जिओ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, फ्रेंच नौदलातील एका कमांडरने एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या J-10C लढाऊ विमानांचे कौतुक करत त्यांना भारतीय राफेलपेक्षा अधिक प्रबळ म्हटले. या कथित विधानावर आधारित अनेक गुगल ट्रेंड्स, यूट्यूब विश्लेषण व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट पाकिस्तानात व्हायरल झाले होते. परंतु, फ्रान्सने एक अधिकृत प्रेस स्टेटमेंट जारी करून हा दावा संपूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ
फ्रेंच नौदलाच्या Marine Nationale ने ट्विटर आणि इतर अधिकृत प्लॅटफॉर्मवर लिहिले:
“Fake News — कॅप्टन लॉने यांनी कधीही अशा प्रकारचे कोणतेही विधान केले नाही. लेखात मोठ्या प्रमाणावर चुकीची, खोटी आणि भ्रामक माहिती आहे.”
Breaking: French Navy terms Pakistan’s Geo TV & it’s correspondent Hamid Mir’s story as ‘misinformation & disinformation’. He had in his story made usual claims on Rafales & May conflict. pic.twitter.com/R9ZwV85eii — Sidhant Sibal (@sidhant) November 23, 2025
credit : social media
या निवेदनानंतर पाकिस्तानच्या तथाकथित “विजयाच्या” कथेला मोठा धक्का बसला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: ट्रम्पला नेमकं हवंय काय? ‘US Peace Plan’ वादाच्या पार्श्वभूमीवर Trumpचा युक्रेनला ‘असा’ अत्यंत स्फोटक सल्ला
हमीद मीर यांनी दावा केला होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात पाकिस्तानी हवाई दलाने राफेल विमाने पाडली आणि फ्रेंच अधिकारी ही बाब स्वीकारत आहेत. परंतु फ्रान्सने स्पष्ट केले त्या कार्यक्रमात भारत-पाकिस्तान, राफेल किंवा J-10C यांचा कोणताही उल्लेख झाला नव्हता. यामुळे हमीद मीर आणि जिओ न्यूजवर पुन्हा एकदा फेक न्यूज पसरवल्याचे सावट गडद झाले आहे.
हा प्रकार पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमेचा एक भाग असल्याचा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्लेषकांनी आरोप केला आहे.
या घटनेनंतर अनेक सुरक्षा तज्ज्ञांनी टिप्पणी करत म्हटले:
“भारतावरील विजयाची कथा तयार करण्यासाठी पाकिस्तान वारंवार बनावट बातम्यांचा आधार घेतो.”
Ans: फ्रान्सने हा दावा “फेक न्यूज” म्हटला आणि पूर्णपणे नाकारला.
Ans: नाही. फ्रेंच सैन्याने सांगितले अशी कोणताही घटना घडलेलीच नाही.
Ans: पाकिस्तानातील जिओ न्यूज आणि पत्रकार हमीद मीर यांनी.






