• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • France Citizens March 80000 Police Secure 300 Detained

Bloquons Tout : फ्रान्समध्ये सरकारविरोधी निदर्शने आणखी तीव्र; 80 हजार पोलिस तैनात, 300 जणांना अटक

Bloquons Tout : फ्रान्समध्ये अर्थसंकल्पात कपात आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने सुरू झाली आहेत. पोलिसांशी संघर्ष, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 10, 2025 | 08:09 PM
france citizens march 80000 police secure 300 detained

Bloquons Tout : फ्रान्समध्ये सरकारविरोधी निदर्शने आणखी तीव्र; ८० हजार पोलिस तैनात, ३०० जणांना अटक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • फ्रान्समध्ये सरकारविरोधी निदर्शने अधिक तीव्र; आतापर्यंत सुमारे ३०० जणांना अटक.
  • अर्थसंकल्प कपात व राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीला डावे पक्ष आणि कामगार संघटनांचा पाठिंबा.
  • आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी नवे पंतप्रधानपद स्वीकारले.

France Bloquons Tout movement : फ्रान्स सध्या एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक उथळपुथळीतून जात आहे. अर्थसंकल्पातील मोठ्या कपाती आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या निदर्शनांनी आता व्यापक आणि हिंसक वळण घेतले आहे. ८० हजारांहून अधिक पोलिस दल तैनात असूनही आंदोलकांचा संताप शमलेला नाही. तोडफोड, जाळपोळ, बस जाळण्याच्या घटना आणि पोलिसांशी संघर्ष यामुळे संपूर्ण देशात अस्वस्थतेचे वातावरण आहे.

आंदोलनांचा विस्तार आणि तीव्रता

पॅरिससह देशभरातील प्रमुख शहरांत आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत जवळपास २९५ आंदोलकांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी १७१ जणांना पॅरिसमध्येच अटक झाली. सकाळपासून तब्बल १०६ ठिकाणी रस्ते अडवले गेले, १०५ जाळपोळीच्या घटना घडल्या आणि चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. आंदोलकांचा रोष वाढत असल्याचे हे चित्र दाखवते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत

डावे पक्ष व ग्रीन पार्टीचा पाठिंबा

या निदर्शनांना आता केवळ सामान्य जनता नव्हे, तर राजकीय पाठबळही मिळू लागले आहे. फ्रान्स अनबाउंड या डाव्या पक्षाचे नेते जीन-ल्यूक मेलेंचॉन यांनी ऑगस्ट महिन्यातच आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर इतर डावे पक्ष व ग्रीन पार्टी देखील या चळवळीत सामील झाले. दोन प्रमुख कामगार संघटनांनी आंदोलनात सक्रिय सहभागाची घोषणा केली आहे, तर इतर संघटना १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय संपाची प्रतीक्षा करत आहेत. यावरून आगामी दिवसांत निदर्शनांचा भडका आणखी मोठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावरचा रोष : बस पेटवली, रेल्वे थांबली

फ्रेंच गृहमंत्री ब्रुनो रेशियो यांनी सांगितले की, रेनेस शहरात आंदोलकांनी एका सार्वजनिक बसला आग लावली. एवढेच नाही तर नैऋत्य भागात वीज वाहिनी खराब झाल्यानंतर रेल्वेसेवाही ठप्प झाली. यामुळे सामान्य जनतेचे हाल अधिक वाढले आहेत. आंदोलन केवळ राजकीय नव्हे, तर दैनंदिन जीवन विस्कळीत करणारे ठरत असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

FRANCE: President Macron just appointed his 5th prime minister in 2 years. In response, the “Block Everything” Movement is calling for a nationwide blockade of roads, halting public services, and mobilizing citizens to stay home. Macron is considering blocking a social media to… pic.twitter.com/J8jVGMeyU9 — @amuse (@amuse) September 10, 2025

credit : social media

सत्तेतील गोंधळ : नव्या पंतप्रधानांची नियुक्ती

या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये महत्त्वाचा राजकीय घडामोडींचा क्रम सुरू आहे. सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी बुधवारी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. ते मॅक्रॉन यांचे जवळचे सहकारी आणि माजी संरक्षणमंत्री आहेत. गेल्या दोन वर्षांत पाचव्यांदा पंतप्रधान बदलले गेले, हे फ्रेंच राजकारणातील अस्थिरतेचे मोठे निदर्शक मानले जात आहे. याआधी फ्रँकोइस बायरो यांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मॅक्रॉन यांच्याकडे राजीनामा दिला होता.

लोकांच्या मनात वाढते प्रश्न

फ्रान्समधील सामान्य नागरिक आज एका द्विधा अवस्थेत आहेत. महागाई, अर्थसंकल्पातील कपात, सरकारी धोरणांविषयीचा असंतोष आणि त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सतत बदलणारे पंतप्रधान या सर्वांमुळे जनतेत भ्रमनिरास वाढला आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, “सरकारने ऐकण्याऐवजी दडपशाही केली तर परिस्थिती आणखी बिघडेल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL

पुढचा मार्ग

१८ सप्टेंबर रोजी घोषित राष्ट्रीय संप हा या आंदोलनांचा पुढचा मोठा टप्पा ठरू शकतो. राजकीय पक्षांचा पाठिंबा, कामगार संघटनांचा सहभाग आणि युवकांचा वाढता उत्साह यामुळे सरकारसमोरची डोकेदुखी अजून वाढणार हे निश्चित आहे. नव्या पंतप्रधान लेकोर्नू यांच्यासाठी हा काळ कसोटीचा असेल.

Web Title: France citizens march 80000 police secure 300 detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • France
  • Protester
  • Student Protest
  • third world war

संबंधित बातम्या

India France Relations : पॅरीसमध्ये उभारले जाणार पहिले हिंदू मंदिर; कोरलेल्या दगडांचे शिलापूजन पडले पार
1

India France Relations : पॅरीसमध्ये उभारले जाणार पहिले हिंदू मंदिर; कोरलेल्या दगडांचे शिलापूजन पडले पार

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे पाथर्डीत चक्क चिमुकल्यांवर आली आंदोलनाची वेळ
2

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे पाथर्डीत चक्क चिमुकल्यांवर आली आंदोलनाची वेळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devkhel Review: ‘महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही’, अंकुश चौधरी आणि प्राजक्ताच्या ‘देवखेळ’ने वेधले लक्ष

Devkhel Review: ‘महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही’, अंकुश चौधरी आणि प्राजक्ताच्या ‘देवखेळ’ने वेधले लक्ष

Jan 30, 2026 | 08:11 AM
‘माझ्यासोबत लग्न नाही केलंस तर मारून टाकीन’ असं म्हणत तरुणीचा विनयभंग; तरुणीला धमकी दिली अन्…

‘माझ्यासोबत लग्न नाही केलंस तर मारून टाकीन’ असं म्हणत तरुणीचा विनयभंग; तरुणीला धमकी दिली अन्…

Jan 30, 2026 | 08:07 AM
Todays Gold-Silver Price: सोनं लवकरच पार करणार 2 लाख रुपयांचा टप्पा, चांदीही गगनाला भिडली

Todays Gold-Silver Price: सोनं लवकरच पार करणार 2 लाख रुपयांचा टप्पा, चांदीही गगनाला भिडली

Jan 30, 2026 | 08:03 AM
चहासोबत काहींना काही चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत मिर्ची वडा, नोट करून घ्या रेसिपी

चहासोबत काहींना काही चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत मिर्ची वडा, नोट करून घ्या रेसिपी

Jan 30, 2026 | 08:00 AM
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध आता थांबणार? रशियाने झेलेन्स्कींना दिले चर्चेसाठी आमंत्रण

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध आता थांबणार? रशियाने झेलेन्स्कींना दिले चर्चेसाठी आमंत्रण

Jan 30, 2026 | 07:15 AM
Pradosh Vrat 2026: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी राशीनुसार करा ‘हे’ उपाय

Pradosh Vrat 2026: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी राशीनुसार करा ‘हे’ उपाय

Jan 30, 2026 | 07:05 AM
परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

Jan 30, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM
Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Jan 29, 2026 | 07:50 PM
Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:33 PM
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:21 PM
Raigad :  पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Raigad : पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Jan 29, 2026 | 07:14 PM
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Jan 29, 2026 | 04:53 PM
Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Jan 29, 2026 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.