France Plane Crash News Two French Air Force jets crash mid-air while rehearsing stunt routine
पॅरिस: फ्रान्समध्ये एक भीषण विमान अपघात घडला आहे. मंगळवारी (25 मार्च) पूर्व फ्रान्समधील हाउट-मार्ने येथील सेंट डिझियरजवळ प्रशिक्षण उड्डाणदरम्यान दोन विमानांची हवेत टक्कर झाली. फ्रेंच हवाई दलाचे दोन अल्फा जेट्स जोरात एकमेकांना धडकले. फ्रेंच हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील एक प्रवासी आणि एक वैमानिक दोघांनी वेळेत बाहेर उडी मारली, यामुळे ते पूर्ण पणे सुरुक्षित आहेत. फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने एलिट पॅटोइल डी फ्रान्स एरोबॅटिक टीमचे होते. अपघातादरम्यान काही नव वैमानिकांचे प्रशिक्षण सुरु होते.टक्कर झाल्यानंतर विमानाला भीषण आग लागली. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
❗️✈️🇫🇷 – Two French Air Force planes collided mid-air earlier today, March 25, 2025, in an incident reported near Saint-Dizier, Haute-Marne, in eastern France.
According to posts on X and initial statements from French authorities, the aircraft involved were Alpha Jets from the… pic.twitter.com/Yf80lmPW8c
— 🔥🗞The Informant (@theinformant_x) March 25, 2025
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना एवढी भयंकर होती की प्रत्यक्षदर्शनींच्या अंगवार काटा आला. दरम्यान जोरदार टक्कर होऊनही कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. घटनास्थाळी उपस्थित लोकांनी या अपघाताचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सुदैवाने प्रवासी आणि वैमानिक अपघातातून थोडक्यात बचावले आहे, मात्र हा अपघात इतका भयंकर होता की क्षणाचाही विलंब झाला असता तर दोघेही गंभीर जखमी झाले असते.
प्रत्यक्षर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, विमानांची टक्कर होताच दोन पॅराशूट उघडताना दिसले. यावरुन स्पष्ट होते की, विमानातील लोक वेळी बाहेर पडले. सध्या बचाव कार्य सुरु असूनही अद्याप इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,या अपघातामुळे डवळ असलेल्या एका कारखान्याला भीषण आग लागली. सध्या संभाव्य जीवतहीनी आणि नुकसानी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, फ्रेंच सशस्त्र दलाचे मंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी सोशल मीडियावर यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,आपात्कालीन सेवा तात्काळ सुरु करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालय आणि सशस्त्र दल एकमेकांच्या संपर्कात आहेत. सध्या हा अपघात कसा झाला याची चौकशी सुरु आहे. या घटनेत सहभागी असलेल्या स्थितीबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही.