जॉर्जिया मेलोनींची चतुर खेळी! एकीकडे रशिया-अमेरिकेला जवळ केले; दुसरीकडे यूक्रेनसोबत मोठा करार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
क्वीव/ रोम: सध्या रशिया आणि यूक्रेनमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. जागतिक पातळीवर अनेक देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण विविध रणनीतींचा वापर करत आहे. यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनो यांनी वेगळीच रणनिती अवलंबवली आहे. त्यांनी अमेरिका आणि रशियाने आपल्या बाजून केले आहेच, परंतु दसरीकडे यूक्रेनसोबत एक मोठा करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृषी विकास आणि अन्न सुरक्षेच्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी इटलीने युक्रेनसोबत 11 दशलक्ष युरोचा करारा केला आहे. यामुळे त्यांना अतिशय चतुर आणि असली खिलाडी म्हटले जात आहे.
इटलीचे कृषी मंत्री विटाली कोवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडेसा ओब्लास्टमध्ये शाश्वत कृषी विकास आणि अन्न सुरक्षेला मदत करण्यासाठी यूक्रेनसोबत मिळून इटलीने Pro.UKR प्रकल्प सुरु केला आहे. या करारांतर्गत शेतकरी, प्रजननकर्ते आणि सहकारी संस्थांना उत्पादन आणि संघटनात्मक क्षमता वाढवण्यासाठी नवीन उपकरणे, तंत्रज्ञान आणि संचिन प्रणालीची मदत करण्यात येणार आहे. कृषी विकासाला चालना देण्यासाठी इटलीने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
यूक्रेनमधील इटालियन राजदूत काला फार्मोस यांनी म्हटले आहे की, युद्धाच्या काळात इटली आणि यूक्रेनचा हा करारा एक महत्वपूर्ण कामगिरी आहे. याच वेळी यूक्रेनला देशाच्या विकासासाठी आणि कृषी पुनर्बांधणीसाठी देखील मदत होईल. तसेच युरोपियन युनियनसोबत संबंध देखील बळकट होतील. यामुळे इटली आणि यूक्रेनचा फायदा होणार आहे.
दुसरीकडे जॉर्जिया मेलोनी यांनी अमेरिका आणि रशियाला इटलीच्या बाजूने जवळ केले आहे. मेलोनी यांनी डावपेचात्मक रणनीती वापरत काही दिवसांपूर्वीच यूक्रेन युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेला मेलोनी यांनी पाठिंबा दर्शवला होता. तर दुसरीकडे यूक्रेनमध्ये शांतता सैन्य पाठवण्याच्या ब्रिटनच्या प्रस्तावाला विरोध केला होता. यामुळे मेलोनी यांनी अप्रत्यक्षपणे रशियालाही आनंदी केले आणि आपल्या बाजूने खेचले. डोनाल्ड ट्रम्प यांचा मेलोनींवरील विश्वास वाढला आहे.
यापूर्वी देखील इटलीच्या पंतप्रदान जॉर्जिया मेलोनी यांनी युक्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने मदत केली होती. त्यांनी यासाठी शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्यांनी युद्धाच्या आव्हानांना समोरो जाण्यासाठी युनायटेड स्टेट्स, युरोपियन राष्ट्र आणि मित्रदेशांनी एकत्र येण्याची मागणी केली होती.
या सर्व घडामोडींमुळे मेलोनींनी एकाच वेळी युक्रेन, अमेरिका आणि रशियासोबत चतुराईने संबंध सुधारले आहेत. त्यामुळे त्या जागतिक राजकारणातील खऱ्या खेळाडू ठरल्या आहेत.