From Jordan-Syria to Iraq Iran's revenge on betraying countries
जॉर्डनमध्ये इराण समर्थित मिलिशिया सक्रिय, सरकारविरुद्ध उठावाची तयारी.
सीरियाने इस्रायलला मदत केल्यामुळे इराण त्याला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
इराकमध्ये अमेरिकन तळांवर थेट हल्ले, सीमेवर सैनिकी करारांद्वारे दबाव वाढवला.
Betrayal countries Middle East : इस्रायल युद्धानंतर मध्यपूर्वेतील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या युद्धात ज्यू राष्ट्राला मदत करणाऱ्या किंवा अप्रत्यक्षरीत्या त्यांना आधार देणाऱ्या देशांविरुद्ध आता इराण उघडपणे सूड उगवत आहे. जॉर्डन, सीरिया आणि इराक या तिन्ही देशांवर इराणने स्वतंत्र रणनीती आखली आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दबाव निर्माण करून इराण हे दाखवू पाहत आहे की युद्धात ‘विश्वासघात’ केल्यास त्याची किंमत मोठी असते.
इस्रायल युद्धादरम्यान जॉर्डनने खुलेपणाने इस्रायलच्या सैन्याला मदत केली. जॉर्डनच्या सीमेवरून आलेली इराणी क्षेपणास्त्रे त्यांनी थेट पाडली. जॉर्डन सरकारने हे सार्वभौमत्वाचे रक्षण असल्याचे सांगितले, पण इराणला मात्र याचा तीव्र संताप आला. युद्धानंतर लगेचच इराणने जॉर्डनमध्ये आपल्या मित्रपक्षीय हिजबुल्लाह आणि कतैब मिलिशियाला सक्रिय केले. जवळपास १२ हजार लढवय्ये जॉर्डनमध्ये सक्रीय झाले आहेत, जे सरकारविरुद्ध उठावाची पटकथा लिहित असल्याचा आरोप आहे. लेबनॉननंतर आता जॉर्डनला हिजबुल्लाहचे नवे तळ बनवण्याची योजना आखली जात आहे. इराणचा उद्देश दुपदरी आहे एकीकडे इस्रायलला जॉर्डनमार्गे घेरणे, तर दुसरीकडे जॉर्डन सरकारला स्पष्ट संदेश देणे की युद्धकाळात विश्वासघात केल्यास त्याचा परिणाम गंभीर असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र
युद्धकाळात सीरियाने इराणच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करून इस्रायलला आपले हवाई क्षेत्र वापरू दिले. तुर्कीच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचे मध्यपूर्वेतील अनेक माध्यमांचे म्हणणे आहे. या भूमिकेमुळे इराणचा विश्वासघात झाल्याचे मानले गेले. आता इराण सीरियालाही धडा शिकवण्यासाठी पुढे सरसावले आहे. एका बाजूला त्यांनी तफसीलशी जोडलेल्या सीरियन गटांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूला, कुनेत्रा परिसर ताब्यात घेण्यासाठी मिलिशिया सक्रिय केली जात आहे. सीरियातील आधीच बिकट असलेल्या अंतर्गत परिस्थितीत हा नवीन दबाव मोठे संकट निर्माण करू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम
इराक हा इराणचा शेजारी देश. युद्धादरम्यान अमेरिकन हस्तक्षेपामुळे इराक इस्रायलविरोधात ठाम उभा राहू शकला नाही. इराणी राजधानी तेहरानवर पडणारी काही क्षेपणास्त्रे इराकमार्गे गेल्याचेही समोर आले. युद्ध संपल्यानंतर इराणने पहिल्याच टप्प्यात इराकमधील अमेरिकन सैनिकी तळावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी एक नवा करार करून इराक सीमेभोवती हल्ल्याची मुभा स्वतःकडे घेतली आहे. याचा अर्थ, इराण आता इराकच्या सीमेमध्ये प्रवेश करून शत्रूराष्ट्रांची शस्त्रे किंवा तळ उद्ध्वस्त करू शकतो. अमेरिकेने विरोध केला असला तरी इराणला त्याचा फारसा फरक पडलेला नाही.