
us iran war tension 2026 trump armada uss abraham lincoln deployment
Trump armada Iran deployment January 2026 : जागतिक राजकारणात सध्या एकाच विषयाची चर्चा आहे आणि ती म्हणजे अमेरिका(America) आणि इराणमधील (Iran) टोकाला गेलेला तणाव. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी आयोवा येथील आपल्या समर्थकांना संबोधित करताना एका खळबळजनक कारवाईचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेचे एक प्रचंड शक्तिशाली नौदल आरमार (Armada) सध्या इराणच्या दिशेने कूच करत आहे. या विधानामुळे मध्यपूर्वेसह संपूर्ण जगात खळबळ उडाली असून युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात या नौदल ताफ्याला “सुंदर” असे संबोधले आहे. ते म्हणाले, “आमच्याकडे त्या दिशेने जाणारी एक मोठी फौज आहे. आम्हाला कदाचित ती वापरावी लागणार नाही, अशी माझी आशा आहे, पण आम्ही पूर्णपणे तयार आहोत.” ट्रम्प यांच्या या ‘आर्मडा’मध्ये यूएसएस अब्राहम लिंकन (USS Abraham Lincoln) ही १ लाख टन वजनाची महाकाय विमानवाहू युद्धनौका आणि अनेक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली विनाशक जहाजे सामील आहेत. ही जहाजे सोमवारीच इराणच्या सीमेजवळ पोहोचली आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-EU FTA : युरोप आणि भारताची ‘महायुती’! ट्रम्प प्रशासन आक्रस्ताळ्या भूमिकेत; अमेरिकेने युरोपला ठरवले ‘देशद्रोही
यावेळी ट्रम्प यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला. त्यांनी सांगितले की, २२ जून २०२५ रोजी अमेरिकेने ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ (Operation Midnight Hammer) अंतर्गत इराणच्या प्रमुख अणुस्थळांवर हल्ले केले होते. या हल्ल्यात इराणच्या ‘फोर्डो’, ‘इस्फहान’ आणि ‘नतांझ’ या तीन मोठ्या अणु केंद्रांचे अतोनात नुकसान झाले. ट्रम्प यांच्या मते, या हल्ल्यामुळे इराणची अणुशक्ती आता पूर्णपणे नष्ट झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते इराण अजूनही आपली ताकद पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे ट्रम्प यांनी आता थेट लष्करी ताफा पाठवला आहे.
Trump says naval ‘armada’ heading toward Iran, as US ‘closely watching’ situation USS Abraham Lincoln and guided-missile destroyers are moving to the Middle East as Trump warns Tehran against killing protesters or reviving its nucl…https://t.co/S7fg6QvkfE pic.twitter.com/xz2Cpu7Szj — Ynet Global (@ynetnews) January 23, 2026
credit – social media and Twitter
अमेरिकेच्या या लष्करी हालचालींवर इराण शांत बसलेला नाही. इराणची राजधानी तेहरानमध्ये भव्य फलक (Billboards) लावण्यात आले आहेत, ज्यावर अमेरिकन युद्धनौका उद्ध्वस्त होताना दाखवण्यात आली आहे. त्यावर स्पष्टपणे लिहिले आहे की, “जर तुम्ही वारा पेरला तर तुम्ही वादळाचे पीक घ्याल.” इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांच्या लष्कराचे बोट ‘ट्रिगर’वर असून, कोणत्याही अमेरिकन हल्ल्याला “कठोर आणि खेदजनक” उत्तर दिले जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Xi Mingze : चीनची ‘राजकुमारी’ सांभाळणार सत्तासूत्रे? शी जिनपिंग यांच्या मुलीच्या राजकीय प्रवेशाची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा
दुसरीकडे, इराणमध्ये अंतर्गत बंडही सुरूच आहे. वाढती महागाई आणि सरकारच्या दडपशाहीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये आतापर्यंत ६,००० हून अधिक नागरिक मारले गेल्याचा दावा मानवाधिकार संघटनांनी केला आहे. ट्रम्प यांनी या आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला असून, “मदत पोहोचत आहे” असे आश्वासन दिले आहे. याच आंदोलकांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ट्रम्प इराणवर लष्करी दबाव टाकत असल्याचे बोलले जात आहे.
Ans: अमेरिकेने 'यूएसएस अब्राहम लिंकन' (USS Abraham Lincoln) ही विमानवाहू युद्धनौका आणि अनेक घातक विनाशक जहाजे इराणच्या सीमेजवळ पाठवली आहेत.
Ans: ट्रम्प यांनी दावा केला की गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणची प्रमुख अणुसंशोधन केंद्रे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
Ans: मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, इराणमधील हिंसक दडपशाहीत आतापर्यंत सुमारे ६,००० लोकांचा मृत्यू झाला आहे.