Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यपूर्व आणि पश्चिम भागांतील युद्ध संपवण्यावर G-20 शिखर परिषदेत भर; अब्जाधीशांवर जागतिक कर लादण्याची मागणी

रिओ दि जानेरो येथे 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान G-20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेत भारतासह इतर संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अधिकारी उपस्थिती होते. या परिषदेत दरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा करण्यात आली.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 20, 2024 | 12:16 PM
मध्यपूर्व आणि पश्चिम भागांतील युद्ध संपवण्यावर G-20 शिखर परिषदेत भर; अब्जाधीशांवर जागतिक कर लादण्याची मागणी

मध्यपूर्व आणि पश्चिम भागांतील युद्ध संपवण्यावर G-20 शिखर परिषदेत भर; अब्जाधीशांवर जागतिक कर लादण्याची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

रिओ दी जानेरो: रिओ दि जानेरो येथे 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान G-20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेत भारतासह इतर संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अधिकारी आणि पंतप्रधान उपस्थिती होते. या परिषदेत दरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय यामध्ये परिषदेच्या संयुक्त घोषणापत्रात भूकमारीशी लढण्यासाठी जागतिक करार करण्याचा, तसेच गाझात अधिक मानवतावादी मदत पोहोचवण्यावर चर्चा करण्यात आली.

गाझा अधिक मानवतावादी मदत पोहोचवण्यावर 20 देशांचा पाठिंबा

या संयुक्त राष्ट्रांच्या निवेदनाला मोठ्या G-20  देशांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला, परंतु पूर्ण सर्वसहमती झाली नाही. तसेच, अरबपतींवर जागतिक कर लावण्याची मागणी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा करण्याचे आवाहनही करण्यात आले. तसेच अनेक तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली होती की, या निर्णयावर युद्धांमुळे प्रभावित झालेल्या परिषदेत करारावर स्वाक्षरी करण्यासाठी नेत्यांची सहमती मिळेल की नाही असे चिंता व्यक्त केली होती.

अर्जेंटिनाने मसुद्यांच्या भाषेबाबत आक्षेप घेतला आणि पूर्ण दस्तऐवजावर अर्जेंटिनाने पहिला पाठिंबा दर्शवला. तसेच इतर काही देशांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला. या संदर्भात ब्राझीलचे माजी मंत्री थॉमस ट्रामैन यांनी सांगितले की, लुइझ इनासियो लुला डा सिल्वा यांनी दिलेल्या नेतृत्वामुळे अखेरच्या क्षणी घोषणापत्र मान्य करण्यात यश आले. इस्त्रायल-हमास युद्धाला आज जवळपास एक वर्ष पुर्ण झाले आहे. या युद्धामुळे गाझा पट्टीत अनेक भागांत मानवी संकंट उभे राहिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia-Ukraine War: रशियाचे युक्रेनच्या निवासी भागांवर प्राणघातक हल्ले; लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू

अमेरिकेचा विरोध

यामुळे या घोषणापत्रात लेबनॉनमधील वाढते तणाव आणि युद्धांमुळे होणाऱ्या मानवीय नुकसानाची निंदा करण्यात आली आहे. यामुळे या युद्धांचा निषेध करत शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनानुसार, पॅलेस्टिनी नागरिकांच्या हक्कांना दुजोरा देत इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी शांतते राहतील यासाठी शांततेचा मार्ग काढण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र, इस्त्रायलच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर अधिक भाष्य करण्यात आलेले नाही. यामुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याला विरोध दर्शवला.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

भूकमारीविरोधात लढण्यासाठी 82 देशांचे समर्थन

घोषणापत्रात अरबपतींवर जागतिक कर लावण्याची मागणीही करण्यात आली असून, जगभरातील सुमारे 3,000 लोक या करामुळे प्रभावित होऊ शकतात. लॅटिन अमेरिकेतील 100 लोक यामध्ये आहेत. मात्र, अर्जेंटिनाने याला विरोध केला आहे. तर भूकमारीविरोधात लढण्यासाठी 82 देशांनी समर्थन दिले आहे.

ब्राझीलचे अध्यक्ष लुला डा सिल्वा यांच्या पुढाकाराने भूकमारीविरोधातील जागतिक आघाडी स्थापन करण्यात आली आहे. G-20 घोषणापत्रात या आघाडीला महत्त्व दिले गेले आहे. तसेच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्यासाठी सर्व देशांनी सहमती दर्शवली आहे. सुरक्षा परिषद सुधारणा 21व्या शतकाच्या गरजांशी सुसंगत होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील, असे या परिषदेत ठळकपणे सांगण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाच्या आण्विक हल्ल्यांच्या धोरणांत बदल; क्षेपणास्त्रांच्या प्रत्युत्तरासाठी वापरणार आण्विक शस्त्रे

Web Title: G 20 summit focus on ending war in middle east and west call nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 12:16 PM

Topics:  

  • G-20 Summit
  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती
1

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
2

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र
3

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा
4

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.