फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कीव: रशिया-युक्रेन युद्ध गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. हे युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर हल्ले अधिक तीव्र केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशिया गेल्या तीन दिवसांपासून युक्रेनच्या निवासी स्थांनांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यात एका लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सुमी शहरावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांत दोन मुलांसह 11 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्यांकखाली अडकले असल्याची भिती बचाव पथकाने व्यक्त केली आहे.
रशिया सतत ड्रोन हल्ले करत आहे
मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने काल पहाटे युक्रेनच्या लुखिव शहरातील एका शैक्षणिक ठिकाणांतील वस्तिगृहाला लक्ष्य करत तीव्र हल्ले केले आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय रशियाने सुमी प्रदेशातील निवासी भागांवरक्लस्टर शस्त्रांनी सुसज्ज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यांत 11 लोक ठार तर 84 लोक जखमी झाले आहेत. यामुळे तेथील नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरलेले आहे.
पुतिन यांना युद्ध संपवण्यात रस नाही
याशिवाय, युक्रेनच्या दक्षिणेकडील ओडेसा या बंदर शहरामध्ये क्षेपणास्त्रांचे हल्ले केले होते. यामुळे शहरामध्ये एका अपार्टमेंटला आग लागली. या आगीत 10 लोक ठार आणि 43 लोक जखमी झाले. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यांवर संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, सततच्या हवाई हल्ल्यांमुळे हे सिद्ध होते की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध संपवण्यात रस नाही. याशिवाय, व्लादिमिर झेलेन्स्की म्हणाले की, “रशियाचा प्रत्येक हल्ला पुतीनच्या खऱ्या हेतूची पुष्टी करतआहे. यामुळे रशियाला न्याय्य शांततेसाठी भाग पाडले पाहिजे.”
युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी- जो बायडेन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती. यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन यावर कोणते पाऊल उचलतील असा तेढ निर्माण झाला होता. दरम्यान अध्यक्ष पुतिन यांनी याविरोधात एक मोठी निर्णय घेतला आहे. त्यांनी रशियन सैन्याला युक्रेनविरोधात आण्विक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापराशी संबंधित धोरणांमध्ये हा महत्त्वपूर्णबदल केला आहे. या बदलेल्या नियमांनुसार, जर कोणत्याही देशाने अणुशक्तीच्या सहकार्याने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला कर रशिया देखील अणवस्त्राचा पार करणार असल्याचे ठरले आहे. अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिल्यानंतर रशियाने हा निर्णय घेतला आहे.