Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव

Narendra Modi in G-20 Summit : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे आयोजित G-20 परिषेदला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले आहे. त्यांनी आपल्या भाषणाने जागतिक व्यासपीठावर भारताचे नेतृत्व उंचावले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2025 | 09:52 AM
PM Modi in G20 Johannesburg Summit

PM Modi in G20 Johannesburg Summit

Follow Us
Close
Follow Us:
  • दक्षिण आफ्रिकेतील G-20 परिषदेची पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती
  • या तीन मुद्यांवर मांडले आपले विचार
  • जाणून घ्या सविस्तर…
 

PM Modi in G-20 Summit : जोहान्सबर्ग : यंदा G-20 परिषद ही पहिल्यांदाच आफ्रिका खंडात पार पडत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारी(२१ नोव्हेंबर) तेथे पोहोचले आहेत. २१ ते २३ नोव्हेंबर ही परिषद होणार असून शनिवारी (२२ नोव्हेंबर) त्यांनी या परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी जागतिक विकासावर भर दिला.

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

G-20 परिषदेत ‘एकता, समानता, शाश्वतता’ याअंतर्गत एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य यावर आधारित वसुधैव कुटुंबकावर भारताचा दृष्टीकोन पंतप्रदान मोदींनी G-20 च्या व्यासपीठावर सादर केला. त्यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चवळीचा उल्लेख करत, दक्षिण आफ्रिकेत G-20 परिषदेचे होणे हे ग्लोबल साउथच्या विकासासाठी महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असल्याचे म्हटले.

यापूर्वी २०२३ साली भारताने या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. याच वेळी दक्षिण आफ्रिकेला याचे सदस्यत्व मिळाले होते, ज्यामध्ये भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणून भारताला ग्लोबल साउथचा आवाज म्हणून ओळखले जाते.

या तीन मुद्यांवर मांडले विचार

पंतप्रधान मोदींनी परिषदेत तीन महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिला. ज्यामध्ये जागतिक स्तरावर सर्वसमावेशक विकास, हवामान बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial Interllegence).

  • पंतप्रधान मोदींनी विकासाचे फायदे सर्व लोकांपर्यंत पोहचवण्याचे महत्व अधोरेखित केले. यूपीआय आणि आयुष्यमान भारत मॉडेलसारख्या डिजिटल पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर भर दिला.
  • तसेच त्यांनी हवामान बदलाला विकसनशील मुद्दा असून मानवतेसाठी संकट निर्माण होत असल्याचे म्हटले. यामुळे हवामानच्या परिस्थिती सुधारण्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. त्यांनी भारताच्या 500 गिगवॉट अक्षय उर्जेचा जागतिक व्यासपीठावर उल्लेख केला.
  • तसेच त्यांनी कृत्रिण बुद्धिमत्ते (AI)वरही भारताचे विचार मांडले. त्यांनी सांगितले की, AI हे मानवी मुल्यांशी सुसंगत असावे. त्याचा मानवाच्या कल्ल्याणासाठी वापर केला जावा. यामुळे देशात असमानता वाढता कामा नये असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

जगातिक विकासासाठी तीन उपक्रमांचा प्रस्ताव 

  • जागतिक पारंपारिक ज्ञान भंडारपंतप्रधान मोदींनी जागतिक पारंपारिक ज्ञानभंडाराची निर्मिती करण्याचा प्रस्तावर मांडला. ज्यामध्ये संतुलित पर्यावरण, संस्कृती आणि पारंपारिक ज्ञानाचे दस्ताऐवजीकरण करुन पुढील पिढींपर्यंत पोहोचवणे. यासाठी भारताची ज्ञान प्रणाली उपयुक्त ठरु शकते असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
  • G-20 आफ्रिका विकास कौशल्य गुणक उपक्रमआफ्रिकेचा जागतिक स्तरावर विकासाचे महत्त्व पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले. यासाठी त्यांनी G-20 आफ्रिका विकास कौशल्य गुणक उपक्रम सादर केला. याअंतर्गत आफ्रिका खंडात सर्व क्षेत्रात ट्रेन-द-ट्रेनर्स मॉडेल वापरण्यावर भर दिला. परिषदेच्या सदस्यांकडूम आर्थिक पाठिंब्याचे आवाहन त्यांनी केले. याचा उद्देश आफ्रिकेत येत्या 10 लाखो तरुणांसाठी नव्या संधी उपलब्ध करणे आहे.
  • ड्रग्ज-दहशतवाद साखळीशी लढातिसरा सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे ड्रग्ज आणि दहशतवादाशी लढा. पंतप्रधान मोदींनी म्हटले की सध्या जगात फेटांनिलसारखी जीवघेणे ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढत आहे. तसेच दहशवादाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे याविरोधात लढा देण्याचा प्रस्ताव पंतप्रधान मोदींनी ठेवला. याअंतर्गत तस्करी रोखणे, पैशांचा बेकायदेशीर वापराला आळा घालणे आणि दहशतवादाला मिळणारा निधी रोखणे महत्वाचे असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. त्यांनी म्हटले की, मानवाच्या सुरक्षा आव्हानांना लढा देण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. सध्या पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर सोशल मीडियावर #ModiAtG20 ट्रेंड होत आहे. त्यांच्या या प्रयत्नांनी भारताचा जागतिक नेतृत्वात मान वाढला आहे.
Spoke at the first session of the G20 Summit in Johannesburg, South Africa, which focussed on inclusive and sustainable growth. With Africa hosting the G20 Summit for the first time, NOW is the right moment for us to revisit our development parameters and focus on growth that is… pic.twitter.com/AxHki7WegR— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2025

G-20 तून मोठा संदेश! UN प्रमुखांचे सदस्य शक्तींना जागतिक शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: G-20 परिषदेत पंतप्रधान मोदींनी कोणत्या मुद्यांवर दिला भर?

    Ans: पंतप्रधान मोदींनी परिषदेत तीन महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिला. ज्यामध्ये जागतिक स्तरावर सर्वसमावेशक विकास, हवामान बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial Interllegence).

  • Que: जागतिक ग्लोबल साउख विकासासाठी पंतप्रधान मोदींनी काय प्रस्ताव मांडला?

    Ans: तसेच जागतिक ग्लोबल साउथच्या विकासासाठी PM मोदींनी पांरपारिक ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याचा, तसेच आफ्रिकन खंडाच्या विकासाचा आणि ड्रग्ज तस्करी व दहशतवादीविरोधी एकत्र लढा देण्याचा प्रस्ताव मांडला.

Web Title: G 20 summit south africa pm narendra modi inclusive sustainable growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • G-20 Summit
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine Peace Plan नाकारताच संतापले ट्रम्प; दिला अल्टीमेटम, आता काय करणार झेलेन्स्की?
1

Ukraine Peace Plan नाकारताच संतापले ट्रम्प; दिला अल्टीमेटम, आता काय करणार झेलेन्स्की?

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?
2

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?

ब्राझीलमध्ये राजकीय गोंधळ! माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना अटक, काय आहे कारण?
3

ब्राझीलमध्ये राजकीय गोंधळ! माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना अटक, काय आहे कारण?

G-20 तून मोठा संदेश! UN प्रमुखांचे सदस्य शक्तींना जागतिक शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन
4

G-20 तून मोठा संदेश! UN प्रमुखांचे सदस्य शक्तींना जागतिक शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.