G-20 तून मोठा संदेश! UN प्रमुखांचे जागतिक शक्तींना शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन; जाणून घ्या काय म्हणाले आणखी अँटोनियो गुटेरस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
G-20 Summit news in Marathi : जोहान्सबर्ग : यंदा २०२५ ची जी-२० शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे सुरु आहे. २१ ते २३ नोव्हेंबर ही परिषद असणार असून आज या परिषदेचे दुसरे सत्र सुरु आहे. या परिषदेत भारतासह इतर जागतिक प्रतिनिधी उपस्थित राहिले आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस देखील या परिषदेसाठी उपस्थित असून त्यांनी इथून मोठा संदेश जगाला दिला आहे.
अँटोनियो गुटेरस यांनी जी-२० शक्तींना जगाच्या शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जी-२०च्या सर्व सदस्य राष्ट्रांना त्यांच्या शक्तीचा वापर जगभरातील अडचणी कमी करण्यासाठी वापरावे असे म्हटले आहे. यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आणि त्याची अमंलबजावणी करण्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) जोहान्सबर्ग येथे गुटेरस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या नेतृत्व आणि दूरदृष्टीची वेळ आहे, यामुळे जी-२० च्या नेत्यांसाठी केवळ एकच संदेश, एकत्र येऊ जगभरातील अडचणी दूर करा. जगभरात सुरु असलेले संघर्ष हवामान बदल, आर्थिक अनिश्चितता आणि कमी होण्याऱ्या जागतिक मदतीवर पुन्हा एकत्र या.
गुटेरस यांनी पुढे म्हटले की, वाढत्या संघर्षामुळे लष्करी खर्च वाढत आहे. यामुळे देशांच्या विकासासाठी संसाधनांची कमरता निर्माण होत आहे. यामुळे जी-२० देशांनी आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांनी अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या देशाच्या आणि जगाच्या चांगल्या भविष्यासाठी, शांततापूर्ण जीवनासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि याची ताकद केवळ या जी-२० देशांमध्ये असल्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे.
यापूर्वी २०२३ मध्ये जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताने भूषवले होते. याच वेळी दक्षिण आफ्रिकेला याचे सदस्यत्व मिळाले. यासाठी भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणून भारताला ग्लोबल साउथचा आवाज म्हणून ओळखले जाऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची परिषदेला उपस्थिती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावणारी आणि एक राजनैतिक आदर्श ठरत आहे.
या परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
या परिषदेदरम्यान शाश्वत विकास, जागतिक प्रशासनांमध्ये सुधारणा, हवामान बदल आणि पर्यावरणीय आव्हाने , आर्थिक संकट, डिजिटल विकास, उर्जा संक्रमणावर, स्टार्टअप्सवर, कृत्रिम बुद्धमत्ती (AI Intelligence) या मुद्यांवर चर्चा होईल. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अमेरिकेच्या बहिष्कारानंतरही मोदी या परिषदेला जात आहे. यामुळे परिषदेत मोदींची काय भूमिका असेल याकडे सर्वजण बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
अमेरिकेच्या विरोधाला भारताकडून कचऱ्याची टोपली? दक्षिण आफ्रिकेतील G-20 मध्ये PM मोदी राहणार उपस्थित
Ans: संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांनी जी-२० शक्तींना जागतिक शांततेसाठी एकत्र येण्याचे आणि अडचणींवर, संघर्ष, हवामान बदल, आर्थिक अनिश्चितता यांसारख्या विषयांवर संयुक्तपण निराकरण करण्याचे आवाहन केले आहे.
Ans: या परिषदेदरम्यान शाश्वत विकास, जागतिक प्रशासनांमध्ये सुधारणा, हवामान बदल आणि पर्यावरणीय आव्हाने , आर्थिक संकट, डिजिटल विकास, उर्जा संक्रमणावर, स्टार्टअप्सवर, कृत्रिम बुद्धमत्ती या मुद्यांवर चर्चा होणार आहे.






