Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza News : गाझावासीयांसाठी FIFA World Cup चे स्क्रीनिंग करणाऱ्या सोशल वर्करचा मृत्यू; इस्रायलने हत्या केली?

Gaza News Today : गाझात झालेल्या इस्रायली हल्ल्यात एक सोशल वर्कर मोहम्मद अल-वाहिदी यांचा मृत्यू झाला आहे. परंतु इस्रायलने हमासशी संबंधित एका व्यक्तीला लक्ष्य केल्याचा हवाला दिला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 07:20 PM
Social Worker killed in Israeli Strike after FIFA World Cup Screening for Gaza People

Social Worker killed in Israeli Strike after FIFA World Cup Screening for Gaza People

Follow Us
Follow Us:
  • गाझावासीयांसाठी FIFA World Cup दाखवणाऱ्या सोशल वर्करचा मृत्यू
  • इस्रायलने हत्या केली?
  • २ मुलांसह ४ जणांचा मृत्यू
Gaza News in Marathi : गाझात इस्रायली हल्ले काही थांबण्याचे नावच घेईनात. नुकत्याच झालेल्या एका हल्ल्यात गाझातील एका सोशल वर्करचा आणि त्याच्यासह २ मुले आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Quatar Former Emir Death : कतारचे माजी अमिर शेख हमद यांचे निधन; भारतात आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा, PM मोदींकडून श्रद्धांजली

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल वर्कर मोहम्मद अल-वाहिदी यांनी गाझातील विस्थापित आणि युद्धग्रस्त नागरिकांसाठी फिफा वर्ल्डकपचे सार्वजनिक आयोजन केले होते. याच्या काही दिवसानंतरच त्यांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायल हल्ल्यात मोहम्मद यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्यासह २ लहान मुलांसाह आणखी २ जण ठार झाले आहेत. यामुळे गाझात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर मोहम्मद यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात मोहम्मद गाझा शहरातील परिसरातून टॅक्सीने प्रवास करत होते. यावेळी इस्रायलचा अचानक हल्ला झाला. या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात ८ आणि १० वर्षाच्या दोन लहान मुलांचा मृत्यूही झाला आहे. तसेच आणखी एका नागरिकाचाही बळी गेला आहे.

इस्रायलची प्रतिक्रिया

या घटनेनंतर इस्रायल लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. हा हल्ला हमासशी संबंधित एका व्यक्तीला मारण्यासाठी करण्यात आला होता असे त्यांनी म्हटले. परंतु या कारवाईत संबंध नसलेल्या गाझा वासियांचा मृत्यू झाल्याचे इस्रायली लष्कराने मान्य केले. परंतु इस्रायलने नेमकं कोणाला लक्ष्य केले होते हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

कोण होते मोहम्मद अल-वाहिदी?

मोहम्मद अल-वाहिदी (वय ६५) हे गाझात संघर्ष सुरु होण्यापूर्वी इंग्रजीचे शिक्षक होते. युद्ध सुरु झाल्यानंतर त्यांनी इजिप्शियन रिलीफ कमिटी मदत संस्थेत काम सुरु केले. ही संस्था गाझातील युद्धग्रस्त आणि विस्थापित नागरिकांना अन्न, औषधे आणि इतर मदत पोहोचवते.

मोहम्मद यांनी गाझा शहर, देर अल-बलाह आणि अल-मवासी भागांत नुकतेच फिफा वर्ल्ड कप सामन्यांचे प्रक्षेपण आयोजित केले होते. सततच्या युद्धामुळे विस्थापित नागरिक मानसिक तणावात होते. यामध्ये विशेष करुन मुलांचा समावेश होता. या वर्ल्डकपचे स्क्रीनिंग त्यांना आनंद मिळवून देण्याच्या हेतूने करण्यात आले होते. यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते.

त्यांच्या कार्यामुळए इतर सामाजिक कार्यकर्त्यांना देखील गाझा वासियांसाठी एक आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र, या वर्ल्ड कपच्या स्क्रीनिंगनंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली.

The human cost of war: A moment of hope in Gaza cut short. Palestinian aid worker Mohamed al-Wahidi, who organized World Cup screenings for civilians, was killed in an Israeli strike. Israel says he was not the intended target.#Statecraft | @Geeta_Mohan pic.twitter.com/xefeP1VhSr — IndiaToday (@IndiaToday) July 9, 2026


Israel Election 2026 : इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला; नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?

Web Title: Gaza news social worker killed in israel strike after fifa world cup screening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Gaza
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव
1

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
2

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
3

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
4

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.