Israel Election 2026 : इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला; नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangkok Pub Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना! पबमध्ये लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
या निवडणुका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. नेतन्याहू देशातील सर्वाधिक काळ राहिलेल्या पंतप्रधान असून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, गेल्या काही काळात झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये ४० टक्क्याहून अधिक लोकांचा नेतन्याहूंना पाठिंबा होता, परंतु जूनपर्यंत यामध्ये २९ टक्क्यापर्यंत घट झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सध्या निवडणूकांमध्ये माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट हे नेतन्याहू यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.
सर्वेक्षणानुसार, सध्याच्या सत्ताधारी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण आहे, परंतु विरोधकांनाही सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या पाठबळाची आवश्यकता आहे. याबाबत अनिश्चितता असल्याचे नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.






