Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza Peace Plan : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प पुन्हा मैदानात? बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची केली घोषणा, पुतिनसह भारताला निमंत्रण

Gaza Peace Plan : गाझा युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. ट्रम्प यांनी यासाठी बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीत सहभागी होण्यासाठी त्यांनी रशिया आणि भारतालाही निमंत्रण दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 19, 2026 | 07:20 PM
Gaza Peace Plan

Gaza Peace Plan

Follow Us
Close
Follow Us:
  • गाझा युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्पचे पुन्हा प्रयत्न सुरु
  • बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची केली घोषणा
  • रशिया आणि भारतालीह सहभागी होण्यासाठी निमंत्रण
Trump Gaza Peace Plan : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गाझा (Gaza) शांतता योजना दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत असून ट्रम्प आता एक बोर्ड ऑफ पीस स्थापन करणार आहे. ही समिती गाझात पुनर्बांधणीसाठी,प्रशासनावर देखरेखीसाठी तयार करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्षपद स्वत: ट्रम्प भूषवणार आहेत. याशिवाय ट्रम्प यांनी या समितीमध्ये सहभागी होण्यासाठी रशिया, भारत, पाकिस्तान तुर्की या देशांना आमंत्रण दिले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा

ट्रम्पचे पाकिस्तान-तुर्कीला आमंत्रण

अमेरिकेच्या व्हाइट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प गाझातील युद्धग्रस्त प्रदेशाचे व्यवस्थापन करण्यासाठी या समितीची स्थापन करत आहेत. यासाठी पॅलेस्टिनींचे एक स्वतंत्र प्रशासन स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान या आंतर्गत ट्रम्प गाझामध्ये सैन्य तैनात करणार आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तान आणि तुर्कीला आमंत्रण दिले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तान हा दहशतवाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देणार देश म्हणून मानला जातो. तर तुर्की हा पाकिस्तानचा मित्र देश आहे. अशा परिस्थिती या देशांचा समितीमध्ये प्रवेश अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

भारताचाही सहभाग महत्वाचा – ट्रम्प

दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या या मंडळात भारताच्या सहभागाचीही इच्छा व्यक्त केली आहे. भारत हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही स्वीकारार्ह देश आहे. दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. यामुळे भारताची बोर्ड ऑफ पीसमध्ये उपस्थिती ही मध्यपूर्वेत शांततेला हातभार लावू शकते. सध्या भारताने यावर कोणतेही अधिकृत विधाने केलेले नाही. यापूर्वी भारताने केवळ ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला पाठिंबा दर्शवला आहे.

रशियाच्या अध्यक्ष पुतिन यांनाही ट्रम्पचे आमंत्रण

याशिवाय ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनाही या शांतता समितीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रिक केले आहे. रशियाच्या क्रेमलिनने याची पुष्टी केली आहे. परंतु अद्याप याबाबत स्पष्ट तपशीलवार देण्यात आलेला नाही.

काय आहे ट्रम्प यांची गाझा शांतता योजना?

गाझामध्ये गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ इस्रायल आणि हमास युद्ध (Isreal Hamas War) सुरु होते. आता या दोन्ही गटांत अमेरिका, कतार च्या मध्यस्थीने युद्ध बंदी लागू करण्यात आली आहे. या युद्धबंदीतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून ट्रम्प आता दुसऱ्या टप्प्याकडे वळत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी आपल्याल कैद्यात असलेल्या लोकांना सोडले आहे. तसेच इस्रायलने आपले सैन्यही माघार घेतले आहे. परंतु अजूनही तणाव पूर्णपणे् निवळलेला नाही.

कारण दुसऱ्या टप्प्यात अमेरिका गाझात पुनर्बांधणीसाठी सैन्य तैनात करणार असून हमासला शस्त्रे सोडायची आहे. परंतु हमासने शस्त्रे सोडण्यास नकार दिला आहे. शिवाय गाझात प्रशासन स्थापन करताना त्यामध्ये हमासचा सहभाग नसणार आहे. या प्रशासनाच्या स्थापनेसाठी आणि गाझाच्या पुनर्बांधणीसाठी ट्रम्प पीस ऑफ बोर्ड समिती स्थापन करत आहेत. जेणेकरुन सर्व घटकांवर देखरेख ठेवता येईल.

Isreal-Hamas Ceasefire: ५०० वेळा युद्धबंदीचे उल्लंघन अन् २७ हल्ले; गाझात शेकडो पॅलेस्टिनींचा मृत्यूने गोंधळ, परिस्थिती अजूनही बिकट

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी काय घोषणा केली आहे? आणि का?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील इस्रायल-हमास युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

  • Que: काय आहे बोर्ड ऑफ पीस?

    Ans: बोर्ड ऑफ पीस हे ट्रम्प यांनी स्थापन केलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गाझातील प्रशासन स्थापन करण्यासाठी, तेथील पुनर्बांधणीवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी या समितीत सहभागी होण्यासाठी कोणत्या देशांना आमंत्रण दिले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी या समितीत सहभागी होण्यासाठी रशिया, भारत, पाकिस्तान, तुर्की यांसह इतर काही देशांना आमंत्रण दिले आहे.

  • Que: या बोर्डाचे अध्यक्षपद कोणाकडे असणार आहे.

    Ans: बोर्ड ऑफ पीसचे अध्यक्षपद स्वत: ट्रम्प भूषवणार आहेत.

Web Title: Gaza peace plan trump re enters diplomatic arena announces formation of board of peace invites india along with putin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Gaza
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

War Alert: शांततेच्या नोबेलवरून राडा! डोनाल्ड ट्रम्पची ग्रीनलँड नाही तर ‘या’ देशाला युद्धाची धमकी; स्वार्थासाठी जगाला धरले वेठीस
1

War Alert: शांततेच्या नोबेलवरून राडा! डोनाल्ड ट्रम्पची ग्रीनलँड नाही तर ‘या’ देशाला युद्धाची धमकी; स्वार्थासाठी जगाला धरले वेठीस

नेपाळच्या राजकारणात भूकंप! बालेन शाह ने महापौर पदाचा दिला राजीनामा; आता थेट PM च्या खुर्चीवर नजर
2

नेपाळच्या राजकारणात भूकंप! बालेन शाह ने महापौर पदाचा दिला राजीनामा; आता थेट PM च्या खुर्चीवर नजर

रस्ते गायब, घरेही दिसेनाशी… रशियात ४ मजली इमारती बर्फाच्या चादरीखाली; 30 वर्षात पहिल्यांदाच भीषण हिमवृष्टी VIDEO
3

रस्ते गायब, घरेही दिसेनाशी… रशियात ४ मजली इमारती बर्फाच्या चादरीखाली; 30 वर्षात पहिल्यांदाच भीषण हिमवृष्टी VIDEO

Greenland Dispute : ‘ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही’ ; टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचा ट्रम्पला स्पष्ट इशारा
4

Greenland Dispute : ‘ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही’ ; टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचा ट्रम्पला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.