Israel Hamas War : '... वेळ संपत चाललीय' ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायलचा मोठा प्रहार! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा, कारवाईचा VIDEO आला समोर
गाझात गेल्या तीन वर्षांपासून इस्रायल हमास संघर्ष सुरु होता. दरम्यान ऑक्टोबरमध्ये दोन्ही गटांमध्ये ट्रम्प यांच्या मध्यस्थीने ६० दिवसांची युद्धबंदी लागू करण्यात आली. या दरम्यान दोन्ही बाजूंनी कैद्यांना सोडले. यानंतर दुसरा टप्प्यात हमासला त्याची शस्त्रे सोडायची होती आणि उर्वरित ओलिसांना सोडायचे होते. परंतु हमासने शरणागती पत्कारण्यास नकार दिला. यानंतर इस्रायलने पुन्हा गाझावर हल्ले सुरु केले होते.
दरम्यान मंगळवारी नेतन्याहूंसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी गाझातील संघर्ष संपवण्यावर जोर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गाझातील संघर्ष संपवायाचा का नाही हे आता हमासच्या हतात आहे. अमेरिका गाझाला पूर्णपणे निशस्त्र केल्याशिवाय कोणत्याही विकासाच्या योजना सुरु करणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्यासोबतच्या बैठकीत पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हमासला शस्त्र त्याग करण्याचा इशारा दिला.
त्यांनी हमासला म्हटले की, तुम्हाला दिलेली वेळआता संपत चालली आहे, हमासने शांतता करारांच्या सर्व अटींचे पालन करावे. अन्यथा त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी सूचित केले. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या गाझा शांतता योजनेला अरब देश आणि मुस्लिम देशांनी पाठिंबा दिला आहे. मात्र हमासच्या हट्टीपणामुळे यामध्ये अडथळ येत आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी इराणवर देखील थेट हल्ला केला आहे. इराणला त्यांचा अणु कार्यक्रम आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न थांबवण्याचे म्हटले आहे. इराणने त्यांचे ऐकले नाही तर त्यांचा हा प्रकल्प पूर्णपणे नष्ट करण्यात येईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
‘मी आठ युद्धे थांबवली, मला नोबेल…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा दावा
Ans: ट्रम्प यांनी हमासला गाझातील शांततेसाठी दुसऱ्या टप्प्यातील कराराच्या अटी मान्य करण्याची चेतावणी दिली आहे. ज्यामध्ये हमासला शस्त्र त्याग करुन उर्वरित इस्रायली ओलिंसाना सोडायचे आहे. हमासने याचे लवकर पालन न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणला त्यांच्या अणु कार्यक्रमाचा आणि बॅलेस्टिक मिसाइल्स निर्मितीचा विकास थांबवण्यास सांगितले असून त्यांनी न ऐकल्यास ते संपूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल असे म्हटले आहे.






