Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza Tragedy : शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकलीचा मृत्यू; वफा आणि वडील इस्रायली हल्ल्यात ठार

Gaza Tragedy : पश्चिम गाझामध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यात आठ वर्षीय वफा अकिला आणि तिचे वडील युसूफ अकिला यांचा मृत्यू झाला. वफासाठी रविवार हा शाळेचा पहिला दिवस होता. मात्र, शाळेत जाण्यापूर्वीच तिचा हल्ल्यात मृत्यू झाला. इस्रायली लष्कराने या कारवाईत हमासच्या सदस्याला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 07, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वप्न अपूर्ण
  • इस्रायलचा दावा ,लक्ष हमासचा सदस्य
  • गाझातील संघर्षात लहान मुलांचे वाढते बळी
Gaza Tragedy : गाझामधील युद्धाच्या भीषण वास्तवाची पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट पुढे आली आहे . ८ वर्षाची वफा अकीला हिच्यासाठी रविवारचा दिवस शाळेचा पहिला दिवस होता . नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वफाचा हा प्रवास मात्र कायमचा ठरला .

पश्चिम गाझा शहरात त्यांच्या वाहनावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात वफा आणि तिचे वडील युसूफ अकिला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . या हल्ल्यात आणखी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे .

शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वप्न अपूर्ण

८ वर्षाची वफा शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन शिक्षणाची सुरवात करण्यासाठी निघाली होती . इतर मुलांप्रमाणे तिच्याही मनात शाळा , मित्र – मैत्रिणी आणि नव्या अनुभवांची उत्सुकता होती . मात्र , पश्चिम गाझामध्ये तिच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याने तिचे स्वप्न क्षणातच संपले आहे .

स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याच्या माहितीनुसार हल्ल्यात वफा आणि तिचे वडील युसूफ अकीला यांचा मृत्यू झाला आहे . या घटनेत आणखी सहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे . घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे .

Gaza : ६२ निष्पाप मुलांसह १०० पॅलेस्टिनींचे मृतदेह दफन; गाझात शोककळा

इस्रायलचा दावा ,लक्ष हमासचा सदस्य

या हल्ल्याबाबत इस्रायली लष्कराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे . लष्कराच्या म्हणण्यानुसार , कारवाईदरम्यान हमासच्या एका सदस्याला लक्ष करण्यात आले होते . हल्ल्याच्या परिणामाचा तपास सुरु असल्याचेही इस्रायली लष्कराने म्हंटले आहे .

मात्र या कारवाईत एका आठ वर्षाचा मुलीसह तिच्या वडिलांच्या मृत्यूने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . युद्धविराम लागू झाल्यानंतरही गाझामध्ये हल्ले सुरु असल्याने सामान्य नागरिकांचे जीवन अजूनही असुरक्षित असल्याचे चित्र आहे .

US Election : ट्रम्प प्रशासन पुन्हा सुप्रीम कोर्टात; टपाल मतदानावर निर्बंधांचा आग्रह

गाझातील संघर्षात लहान मुलांचे वाढते बळी

गाझामधील संघर्षात सर्वाधिक फटका नागरिकांना आणि विशेषतः लहान मुलांना बसत असल्याचे वारंवार समोर आले आहे . घर शाळा किंवा रस्त्यावर असतानाही नागरिकांना हल्ल्याची भीती कायम आहे . वफाच्या मृत्यूने या संघर्षातील मानवी किंमत पुन्हा अधोरेखित केली आहे . ज्या दिवशी एका चिमुकलीने शिक्षणाच्या नव्या प्रवासाला सुरवात करायची होती , त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला .

तसेच त्या गाडीमध्ये असलेल्या तिच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे . गाझामधील एवढी निरागस निष्पाप लहान मूल मरण्याची ही पहिलीच वेळ नसून ,याआधी सुद्धा बऱ्याच मुलांची हत्या झालेली आहे . चुकीचा देशाभिमान , दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष , जमीन आणि नैसर्गिक स्रोत बळकावण्याची असुरी इच्छा या मुळे संबंध नसताना निष्पाप लोकांचा , लहान मुलांचा आणि स्त्रियांचा मृत्यू होत असल्याने जगभरात यावर दुःख , हळहळ , आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . असे आपल्याला दिसून येते .

 

 

Web Title: Gaza tragedy little girl dies on her very first day of school wafa and her father killed in an israeli attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Gaza
  • gaza attack
  • Israel and Hamas War
  • israel-palestine war

संबंधित बातम्या

Gaza : ६२ निष्पाप मुलांसह १०० पॅलेस्टिनींचे मृतदेह दफन; गाझात शोककळा
1

Gaza : ६२ निष्पाप मुलांसह १०० पॅलेस्टिनींचे मृतदेह दफन; गाझात शोककळा

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप
2

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप

Gaza War : युद्धविरामानंतरही गाझात ९०० हून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्रालयाचा गंभीर दावा
3

Gaza War : युद्धविरामानंतरही गाझात ९०० हून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्रालयाचा गंभीर दावा

Gaza War : गाझा शहराच्या पश्चिमेला इस्रायली हवाई हल्ले; ५ पॅलेस्टिनी ठार
4

Gaza War : गाझा शहराच्या पश्चिमेला इस्रायली हवाई हल्ले; ५ पॅलेस्टिनी ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.