Gaza War 7 Israeli soldiers killed in southern Gaza during Iran-Israel war
Israel Hamas war news marathi : गेल्या आठवड्यात जवळपास १२ दिवस इस्रायल आणि इराणमध्ये संघर्षाचे वातावरण होते. दरम्यान संपूर्ण जगाचे लक्ष इराण आणि इस्रायलकडे लागले असताना गाझामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दावा केला जात आहे की, दक्षिण गाझात हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सैनिंकाची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हमासने इस्रायली सैन्याच्या चिलखती वाहनाला लक्ष्य केले. हमासने मोठा स्फोट घडवून आणला. या स्फोटात सात इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही काळापासून इस्रायली सैनिक गाझामध्ये सतत लष्करी कारवाई करत होते. यादरम्यान अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराण आणि इस्रायलच्या युद्धकाळात गाझामध्ये लष्करी कारवाई थांबली होती. याच वेळी हमासने इस्रायली सैनिकांना लक्ष्य केले. सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतर पुन्हा एकदा गाझाकडे लक्ष वेधले गेले आहे.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गाझामध्ये शहर खान युनूस शहरावर हमासने हल्ला केला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरु झालेल्या युद्धात आतापर्यंत ८६० हून अधिका इस्रायली सैनिक मारले गेले आहेत.
दरम्यान हमासने दावा केा आहे. त्यांनी निवासी इमारतीत लपलेल्या इस्रायली सैनिकांवर हल्ला केला आहे.हमासच्या लष्कराचे अल-कासिम यांनी म्हटले आहे की, दक्षिण गाझातील एक निवासी इमारतीवर त्यांच्या लढवय्यांनी हल्ला केला. या ठिकाणी इस्रायली सैनिक लपून बसले होते.
सध्या गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. इस्रायलच्या आतापर्यंतच्या कारवाईत गाझात ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो लोक जखमीही झाले आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझात विनाशचे दृश्य पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पायभूत सुविधा देखील मिळाले कठीण आहे.
दरम्यान हमासच्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा इस्रायल गाझामध्ये हमासविरोधी लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा गाझातमध्ये हल्ले आणि लोकांच्या किंकाळ्या, आक्रोश वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गाझातील पॅलेस्टिनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.