मेक्सिको सिटी : एक मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी (२४ जून) रात्री एका महोत्सवादरम्यान मेक्सिकोमध्ये अंदाधुद गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या ग्वानाजुआटो राज्यातील इरापुआटो शहरात ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
निक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जणांच ओळख पटली आहे. यामध्ये २ महिलांचा आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. तसेच मृतांमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या हल्ल्याचा तपास सुरु आहे.
इरापुआटो मध्ये संत जॉन द बॅप्टिस्टच्या निमित्ताने लोक एकत्र जमले होते. सर्वजण आनंदाने नाचत होते, गात होता. आनंदाने आपला उत्सव साजरा करत होते. या दरम्यान ही घटना घडली. या एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये लोक सण साजरा करत असताना अचानक गोळीबाराच्या आवाजाने सैरावर झाल्यचे दिसून येते आहे.
🚨A mass shooting in Irapuato, 🇲🇽Mexico, killed at least 11 people, including a 17-year-old, and injured 20 more. The attack occurred during a Catholic celebration. Guanajuato, the state’s location, is known for violent gang activity. President Sheinbaum called it “very… pic.twitter.com/wkpm1ZVsM1 — Info Room (@InfoR00M) June 25, 2025
मेक्सिकोचे राष्ट्रपती क्लाडिया शेनबॉम यांनी या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगतिले आहे. तसचे स्थानिक अधिकारी रोडोल्फो गोमेझ सर्व्हेंटेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटनेचा तपास सुरु असून या हल्ल्याला भ्याड हल्ल्या म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र अद्याप या हल्ल्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
गेल्या काही काळापासून मेक्सिकोच्या ग्वानाजुटाओ राज्यात सर्वाधित हिंसाचाराच्या घटना घडल्य आहेत. या भागात अनेक गुन्हेगारी संघटनांमध्ये संघर्ष सुरु आहे. या वर्षा जानेवारीच्या सुरुवातीपासून १,४३५ खूनाच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. यापूर्वी मे महिन्यात मेक्सिकोच्या सॅन बार्टोलो येथे कॅथोलिक चर्चच्या पार्टीत गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. या वाढत्या घटनांमुळे स्थानिक प्रशासनांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.