Gaza War Israel again attack on Gaza 81 Palestinians killed, more than 400 injured in airstrikes
Gaza War News Marathi: जेरुसेलम : इस्रायल आणि इराणमध्ये १२ दिवसांचे युद्ध सध्या थांबले आहे. परंतु आता इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलने पुन्हा आपले लक्ष गाझाकडे वळवले आहे. पुन्हा एकदा इस्रायली सैन्याने गाझावर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान ८१ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेस आहे.
इस्रायली संरक्षण दलाने गाझाच्या निवासी भागांना लक्ष्य केले आहे. एक रहिवाशी इमारत, शाळा, स्टेडियमला लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायलने या भांगावर बॉम्ब हल्ले केले आहेत. यामुले परिसरात धूळ, आग आणि मृतदेह पडलेले दिसत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने मोठ्या संख्येने लोकांचा बळी जात असल्याचे म्हटले आहे. तसेच मृतांचा आकाडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. पॅलेस्टिनी लोकांनी इस्रायलच्या या हल्ल्याला भयानकतेचे आणि क्रूरतेचे संबोधले आहे.
हे हल्ले अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा, एक दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील युद्धबंदीवर विधान केले होते. त्यांनी एका आठवड्यात गाझामध्येही युद्धबंदीचा दावा केला होता. परंतु इस्रायलच्या या कृत्यामुळे मोठी शंका निर्माण झाली आहे. शनिवारी (२८ जून) रोजी देखील इस्रायलने गाझाच्या खान युनूस आणि जबलियामधील निर्वासित छावण्यांवर तीव्र हल्ले केले होते. यामध्ये ४२ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला होता. तर याच्या एकदिवस आधी शुक्रवारी (२७ जून) रोजी २८ जणांचा मृत्यू झाला होता. तीन दिवसांत मृतांचा आकडा १५० च्या जवळ पोहोचला आहे.
U.S. President Trump: Make the deal in Gaza. Get the hostages back!!! pic.twitter.com/pPA3wj3r4d
— Ariel Oseran أريئل أوسيران (@ariel_oseran) June 29, 2025
याच वेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा गाझात युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रविवारी ट्रम्प यांनी पुन्हा गाझा युद्धबंदी चर्चा सुरु करण्याचे आवाहन केले आहे. २० महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध थांबेल असा करार करण्याची गरज ट्रम्प यांनी अधोरेखित केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी गाझामध्ये करारा करा. बंधकांना सोडवा, असे म्हटले आहे. परंतु अशा परिस्थिथतीत इस्रायलच्या हल्ल्याने पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडाला आहे. आता ट्रम्प इस्रायलच्या या कृतीवर काय निर्णय घेतली हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.