Gaza War : इराणनंतर आता गाझात युद्धबंदी करणार ट्रम्प? आठवडाभरात संघर्षविराम करण्याचे दिले संकेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Gaza War news Marathi : गाझा पट्टी : सध्या इराण आणि इस्रायलमधी संघर्ष थांबला आहे. परंतु दोन्ही देशात तणाव कायम आहे. २२ जून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण दोन्ही देशांनी त्यांच्याकडे युद्धबंदीसाठी निवंती केल्याचा दावा केला होता. परंतु इराणने असा कोणताही करार झालेला नाही असे म्हटले होते. आता ट्रम्प यांनी गाझात सुरु असलेले इस्रायल आणि हमास युद्ध संपवण्याचा देखील इशारा दिला आहे.
इस्रायल आणि इराणच्या युद्धादरम्यान गाझामध्ये थोडा काळा शांतात होती, खरी परंतु या काळात हमासच्या लढवय्यांनी इस्रायली सैनिकांवर हल्ला केला. यामध्ये सात इस्रायली सैनिकांचा मृत्यूची माहिती समोर आली आहे. यावर नेतन्याहूंनी संताप देखील व्यक्त केला होता.
याच वेळी आता ट्रम्प यांनी गाझातील हमास आणि इस्रायलचा संघर्ष एका आठवड्यात संपवण्याचे आश्वासन दिले आहे. शुक्रवारी पत्रकांरशी बोलकाना ट्रम्प यांनी, पुढी एका आठावड्यात गाझातीव युद्धही थांबेल असा मला विश्वास आहे, असे म्हटले होते. त्यांनी सांगतिले की, “मी युद्धबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. व्हाईट हाईसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी गाझात युद्धबंदी लागू करण्याचे संकेत दिले. मात्र, ट्रम्प यांनी नेमकी कोणाशी चर्चा केली याबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पदाची शपथ घेतल्यानंतरही गाझातील युद्ध संपवण्याचे म्हटले होते. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू झाली होती. याअंतर्गत इस्रायल आणि हमासने कैदेत असलेल्या लोकांना मुक्त केले. परंतु मार्चमध्ये इस्रायलने पुन्हा एकदा गाझातील हमासविरोधी कारवाई सुरु केली. हमासने इस्रायलच्या अटी मान्य करण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा गाझात युद्ध सुरु झाले.
तसेच ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्धही संपवण्याचे आश्वान दिले होते. परंतु रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्षविराम करण्यातही ट्रम्प अपयशी ठरले. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण आहेच. तसेच रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरु आहेत.
ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय पुन्हा घेतले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस लष्करी संघर्ष सुरु होता. याच दरम्यान १० मे रोजी ट्रम्प यांनी सांयकाळी पाच वाजता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीच घोषणा केली. याची माहिती ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिली. तेव्हापासून ट्रम्प यांनी अनेक वेळा भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. तसेच पाकिस्तानने देखील ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. परंतु भारताने या युद्धात कोणत्याही पक्षाची मध्यस्थी नाकारली आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा गाझातील इस्रायल आणि हमास युद्ध संपवण्याचे म्हटले आहे, परंतु दोन्ही गटांनी कोणताही करार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे आता ट्रम्प इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदी काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.