Gaza war Israel fires on hungry Palestinians in Gaza, 67 dead, dozens injured
Israel Firing in Gaza : जेरुसेलम : इराणसोबतच्या युद्धबंदीनंतर आता इस्रायलने पुन्हा एकदा आपले लक्ष गाझाकडे वळवले आहे. पुन्हा एकदा इस्रायलने गाझामध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच इस्रायलने गाझातीव अन्न शोधण्यासाठी धडपड करणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांवर गोळीबार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याने गाझामध्ये केलेल्या गोळीबारात ६७ जण ठार झाले आहे. इस्रायलच्या या कारवाईचा जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे.
सैन्याने समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एका कॅफेवर गोळीबार केला आहे. यामझध्ये ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्न शोधत असलेल्या २२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोणतीही पूर्वसुचना न देता हा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय हवाई हल्ल्यांमुळे गाझाच्या सुद्रकिनारपट्टीवर भूकंपाचे धक्के देखील जाणवले आहे. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु काहींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे, तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
तसेच या हल्ल्यात लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच महिलांचाही समावेश आहे. अचानक हल्ला झाल्यामुळे लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. गेल्या २० महिन्यांपासून हे युद्ध सुरु आहे. गेल्या आठवड्यात देखील इस्रायलने गाझामध्ये हल्ला केला होता. ज्यामध्ये ८१ लोकांचा मृत्यू आणि ४०० हून अधिक लोक जखमी झाले होते. यामध्ये रहिवाशी इमारतींना, शाळा, स्टेडियमला आणि छावण्यांना लक्ष्य केले जात आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी गाझामध्ये एक आठवड्यात युद्धबंदीचा इशारा दिला असताना हे हल्ले होत आहे. २० महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध थांबेल असा करार करण्याची गरज ट्रम्प यांनी अधोरेखित केली होती. मात्र इस्रायलच्या या हल्ल्यांमुळे युद्धबंदीची शंका निर्माण झाली आहे. इस्रायलने २८ जून रोजी देखील गाझाच्या खान सुनूस शहरात हल्ला केला होता. तर त्याच्या एकदिवसापूर्वी देखील हल्ला केला होता. सध्या गाझातील मृतांच्या आकड्यात पुन्हा एकदा वाढ होत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गाझातील लोकांना पायाभूत सुविधा मिळणे देखील कठीण झाले आहे.