Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी

Greece Wildfire Update : युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेचे परिणाम दिसू लागले आहे. युरोपीय देश ग्रीसमध्ये उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे जंगलाला आग लागली असून यामध्ये वडिलांसह १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 11:26 AM
Greece Wildfire

Greece Wildfire

Follow Us
Follow Us:
  • ग्रीसमध्ये वणव्याचा कहर
  • अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू
  • अनेक भागांत अलर्ट जारी
Greece Wildfire News in Marathi : अथेन्स : सध्या युरोपीय देश उष्णतेने जळू लागले आहे. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, ग्रीस यांसारख्या शहरांमध्ये तापमानाने कहर केला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये भीषण वणव्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रीसमध्ये लागलेल्या जंगलाच्या आगीने प्रचंड कहर केला आहे.

उत्तर ग्रीसमधील थेसालोनिकीजवळ लागलेल्या एका वणव्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या वणव्यात १२ वर्षीय मुलासह वडिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस

नेमकं काय घडलं?

स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३० जून) उत्तर ग्रीसच्या थेसालोनिकीजवळ असलेल्या जंगल परिसरात भीषण आग लागली होती. या आगीने काही वेळातच आसपासच्या घरांना आगीच्या विळख्यात लपटले होते. आग वेगाने पसरत होती, ग्रीस सरकारने तातडीने बचाव कार्य आणि आग विझवण्याचे काम सुरु केले होते.

आग नियंत्रणात आणण्यासाठी १३५ हून अधिक अग्निशमन अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले. तसेच ९ पाण्याचे फवारे मारणारी विमाने आणि ६ हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्यात आली. दरम्यान आग विझल्यानंतर अग्निशमन दलाला एका घराबाहेर व्यक्तीचा मृतहेद आढळला. यानंतर बुधवारी (०१ जुलै) घराच्या जळालेल्या अवशेषांमध्ये १२ वर्षीय मूलाचा मृतहेद सापडला.

गावे रिकामी करण्याचे आदेश

आगीचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने ग्रीसमधील दोन गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर ग्रीसमधील हाल्किदिकी, राजधानी अथेन्सजवळी सलामिना बेट आणि दक्षिण ग्रीसमधील काही भागांमध्ये जंगलाने पेट घेतला होता. सुदैवाने प्रशासनाला आग विझवण्यात यश आले आहे.

दरवर्षी घडतात वणव्याच्या घटना

ग्रीसमध्ये दरवर्षी उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे जंगलातील वणव्याच्या घटना घडतात. यापूर्वी २०१८ मध्ये लागलेल्या आगीत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०२३ मध्ये लागलेली आग युरोपमधील सर्वात मोठ्या आगींपैकी एक मानली गेली.

यंदाही वाढत्या तापमानामुळे वणव्यांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारने देशाच्या अनेक भागांमध्ये अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सुरक्षेच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Helicopter Crash : अमेरिकन लष्कराचे MH60 हेलिकॉप्टर क्रॅश; आपत्कालीन लँडिंग करताना झाला अपघात

Web Title: Greece wildfire father son die fire alert issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Greece
  • Wildfire
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.