Hamas Cruelty Israeli Womens Bodies Sexually Abused The Times Shocking Revelation
Israel Hamas War News : इस्रायल आणि हमास युद्धाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी या युद्धाला हमासने सुरुवात केली होती. त्यानंतर हा रक्तरंजित लढा इराणपर्यंत पोहोचला. इस्रायल आणि हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या अनेक लोकांचा मृत्यू झाला. परंतु या हल्ल्यात हमासने क्रूरतेची मर्यादा ओलांडली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ल्यात मृत पावलेल्या महिलांच्या मृतदेहांचे लैंगिक शोषण केले असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. लंडनच्या द टाईम्स वृत्तपत्राने यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. हमासने केलेल्या या हल्ल्यात 1,200 इस्रायली लोकांचा बळी गेला होता. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता.
तसेच धक्कादायक बाब म्हणजे हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलांच्या मृतदेहांचे लैंगिक शोषण केल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी महिलांना झाडांना, खांबांना बांधले. यानंतर त्यांनी त्यांच्या अंगवारचे कपडे काढले आणि त्यांच्या गुप्तांगात आणि डोक्यात गोळ्या झाडल्या. याशिवाय अनेक महिलांचे सामूहिक लैंगिक शोषण देखील करण्यात आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहेत.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या सर्व घटनांचा खुलासा सुटका झालेल्या इस्रायली ओलिसांनी केला आहे. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या एका पीडीतिने आणि इतर ओलिसांनी याबाबत सांगतिले आहे. पीडितांनी हमासच्या क्रूरतेने मर्यादा ओलांडली असल्याचे म्हटले. त्यांनी सांगतिले की, महिलांवर आणि तरुणींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच त्यानंतर महिलांना तसेच मरणासाठी सोडण्यात आले.ओलिसांनी सांगितले की, अनेक मतदेहांचै लैंगिक शोषण करुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, आयसिस आणि बोको हरामच्या दहशतवाद्यांनी लैंगिक हिंसाचाराच्या पद्धतीचा वापर केला होता. याचाच वापर हमासने केला आहे. या दहशतवादी संघटनांनी देखील अनेकवेळा लोकांना त्यांचे कपडे काढून, त्यांना ठार केल्याचे तसेच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे अनेक पुरावे सापडले आहेत.
सध्या इस्रायल आणि इराणमधील तणाव कमी झाला आहे. अशातच पुन्हा इस्रायलने गाझामध्ये हल्ले सुरु केले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी देखील हल्ले केले आहेत. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गाझामध्ये हमासने केलेल्या स्फोटात इस्रायलचे पाच सैनिक ठार झाले आहेत.
गाझातील आरोग्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि हमासमध्ये अजूनही लष्करी कारवाई सुरुच आहे. यामुळे गाझातील लोकांचे हाल होत आहेत. लोकांना पायाभूत सुविधा मिळणे देखील कठीण झाले आहे. याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील युद्ध संपवण्याचा दावा केला आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटनांना त्यांनी युद्धबंदी करवण्याचे आवाहन केले आहे.