Hamas faces a severe threat as Israel and the US take tough action
जेरुसलेम – गाझातील इस्लामिक लढाऊ संघटना हमासच्या अस्तित्वावर मोठे संकट कोसळले आहे. इस्रायल आणि अमेरिका यांनी आधीच हमासविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असताना आता आश्चर्यकारकपणे पाच अरब मुस्लिम देशांनीही हमासविरोधात आघाडी उघडली आहे. या देशांनी ‘गाझा पुनर्विकास’ नावाचा प्रस्ताव तयार केला असून, त्यानुसार गाझामधून हमासचे उच्चाटन करून त्याजागी एक नवीन संघटना स्थापन करण्याचे नियोजन आहे.
अमेरिकेचा हमासला अंतिम इशारा
इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या शांतता कराराच्या हालचाली सुरू असल्या तरी इस्रायलच्या ओलीसांचे मृतदेह परत करण्यास हमासने नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कठोर इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, “जर हमासने इस्रायलच्या ओलीसांचे मृतदेह परत केले नाहीत, तर हमासचा एकही लढवय्या जिवंत राहणार नाही.” ट्रम्प यांच्या या वक्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून, हमास याला कितपत गांभीर्याने घेते हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, अमेरिकेने थेट विनाशाची धमकी दिल्याने हमासच्या भविष्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चिनी डॉक्टरांचा अजब कारनामा! अर्धांगवायू झालेला रुग्ण चक्क उभे राहून लागला चालायला
इस्रायलच्या नव्या लष्करप्रमुखांचा हमासविरोधी कट्टर भूमिकेचा संकल्प
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इयाल जमीर यांची इस्रायलच्या नवीन लष्करी प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारताच जमीर यांनी हमासचा संपूर्ण नाश करण्याची शपथ घेतली आहे. गेल्या काही दशकांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू आहे, मात्र जमीर हे सुरुवातीपासूनच गाझाविरोधी लष्करी मोहिमांमध्ये आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात इस्रायल हमासच्या संपूर्ण उच्चाटनासाठी कठोर पावले उचलू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
पाच मुस्लिम देशांची हमासविरोधात भूमिका
आतापर्यंत असा समज होता की, हमासला मुस्लिम देशांचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, आश्चर्यकारकपणे आता सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात (UAE), जॉर्डन आणि इजिप्त या पाच प्रमुख मुस्लिम देशांनी हमासविरोधात भूमिका घेतली आहे. या देशांनी एक विशेष प्रस्ताव तयार केला असून, त्यानुसार गाझातील हमासचा प्रभाव पूर्णतः संपुष्टात आणून त्याजागी “टेक्नो फ्रेंड ऑर्गनायझेशन” नावाची नवीन संघटना स्थापन करण्याची योजना आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर हमासचे अस्तित्व केवळ इतिहासात नोंदले जाईल, असा दावा करण्यात येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऑस्ट्रेलियात सर्वात भीषण चक्रीवादळ ‘अल्फ्रेड’चा कहर; 40 लाख लोक धोक्यात, लॉकडाउन सारखी स्थिती
हमाससाठी उलटी गिनती सुरू?
1987 मध्ये इस्रायलच्या विरोधात उभारलेली हमास संघटना आता ३८ वर्षांनंतर अस्तित्वाच्या संकटाला सामोरी जात आहे. इस्रायल, अमेरिका आणि आता स्वतः मुस्लिम देशांनीच त्याच्या नाशाची मोहीम आखल्याने येत्या नऊ महिन्यांत हमासचा अस्तित्व समाप्त होईल, असा अंदाज आहे. युरोप आणि पश्चिम आशियातील तज्ज्ञांचे मत आहे की, हमासला जर आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर त्याने शांतता करारास सहमती दर्शवावी अन्यथा त्याच्या संपूर्ण नाशाची शक्यता अधिक आहे. पुढील काही महिने गाझा पट्ट्यासाठी आणि पॅलेस्टिनी राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.