Hamas to release six Israeli captives to be exchanged for 602 Palestinian prisoners
जेरुसेलम: पॅलेस्टिनी उग्रवादी संघटना हमास आज 6 इस्त्रायली बंधकांना मुक्त करणार आहे. ही संख्या आधी ठरलेल्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. या ओलिसांच्या बदल्यात, इस्त्रायल 602 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. हमास इस्त्रायल युद्धविराम कराराच्या पहिल्या टप्प्यातील ही शेवटची कारवाई असेल. यापूर्वी कारवाईत चार इस्त्रायली बंधकांचे मृतदेह मागील गुरुवारी परत करण्यात आले होते.
इस्त्रायल महिला बंधकांना सोडणार
हमास इस्त्रायली बंधकांना सोडणार असून त्यात एलिया कोहेन, ओमर शेम तोव, ताल शोहम, ओमर वेनकर्ट, हिशाम अल-सईद आणि एवेरा मेंगिस्टो यांचा समावेश आहे. यापूर्वी इस्त्रायलने 2023 मध्ये बंधक बनवलेल्या सर्व महिलांना आणि 19 वर्षाखालील पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले होते.
यासोबत, इस्त्रायल गाझातून कचरा हटवण्यासाठी आवश्यक मशीन इजिप्तच्या सीमारेषेवरून पाठवण्याची परवानगी देईल. नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू झालेल्या युद्धविराम कराराच्या अंतर्गत, हे बंधक आणि कैद्यांच्या अदलाबदलीचे सातवे प्रकरण आहे.
युद्धबंदीचा दुसरा टप्पा
हमास आणि इस्त्रायलच्या युद्धबंदी कराराचा पहिला टप्पा पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला लागले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या शनिवारी 602 पॅलेस्टिनी कैदी आणि ओलिसांची सुटका होणार आहे. यात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेले 157 कैदी तसेच गाझा पट्टीतून आलेल्या 445 ओलिसांची सुटका केली जाणार आहे.
दुसरा टप्पा लवकर पूर्ण करण्याचे आवाहन
हमासच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण युद्धविराम आणि गाझा पट्टीतून इस्त्रायली सैन्याची माघार यासह इतर अटी लवकरात लवकर पूर्ण केल्या जाणार आहेत. हमासने यासंदर्भात तत्परता दर्शवली असून इस्त्रायलनेही वेळ न घालवता या अटी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. गाझा संघर्षविरामाच्या या टप्प्यातील हालचालींनी युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.
संघर्ष पुन्हा उफाळला
याचदरम्यान एकीकडे युद्धविराम सुरु असताना पुन्हा एक संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. हमासने यांच्या काही नागरिकांची हत्या केली आहे, असा आरोप इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासवर केला आहे. याची हमासला मोठी किंमत चुकवावी लागेल. हमासने परत केलेल्या चार मृतदेहांपैकी एक गाझा येथील एका महिलेचा होता, पूर्वी सांगितल्याप्रमाणे शिरी बिबासचा नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.