Gaza Ceasefire: इशारा देऊनही फक्त तीन ओलिसांची सुटका; इस्त्रायल-हमास युद्ध पुन्हा पेटणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: सध्या हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्धविराम सुरु असून यामध्ये ओलिसांची सुटका सुरु आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला सर्व ओलिसांच्या सुटकेचा आदेश दिला होता. तसेच हा इसारा देण्याच्या एक दिवस आधी (8 फेब्रुवारी) 3 ओलिसांची सुटका केली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी तीन बंधकांचा सुटका करण्यात आली असून या बदल्यात ज्यू राज्याच्या 379 पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्यात येणार आहे.
हमासने मुक्त केलेल्या तीन बंधकांना 7 ऑक्टोबर 2023 रोजी किबुत्ज नीर ओज येथील हल्ल्यात पकडण्यात आले होते. सोडण्यात आलेल्या या बंधकांमध्ये 29 वर्षीय रशियन-इस्त्रायली अलेक्झांडर ट्रोफानोव, 46 वर्षीय अर्जेंटाईनी-इस्त्रायली यायर हॉर्न, आणि 36 वर्षीय अमेरिकन-इस्त्रायली सगुई डेकेल-चेन यांचा व्यक्तींचा समावेश आहे. हमासने या तिघांना रेड क्रॉसच्या ताब्यात दिले असून ते इस्रायलकडे रवाना झाले आहेत.
हमाासचे नेमकं चालंलय काय?
19 जानेवारी गाझा युद्धविराम लागू करण्यात आल्यानंतर हमासने आतापर्यंत 16 इस्त्रायली आणि पाच थाई बंधकांची सुटका केली आहे. या बदल्यात इस्त्रायलने 776 पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त केले आहे. हमासने देखील युद्धविराम पाळणार असल्याची तयारी दाखवत सर्व ओलिसांची लवतरच सुटका करण्याचे मान्य केले आहे.
मात्र, हमाने शनिवारी अचानक सर्व बंधकांची सुटका करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर संघर्षविरामाच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांनी इस्त्रायलववर गाझा पट्टीच मदत पोहोचवण्यामध्ये अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, हा आरोप इस्त्रायलने फेटाळून लावला आहे.
गाझा क्षेत्रात पुन्हा इस्त्रायली सैन्य तेनात
गाझा सीमा क्षेत्रात इस्रायली सैन्य तैनात करण्याचे आदेश नेतन्याहूंनी दिले आहेत त्यांनी म्हटले आहे की, “हमासने बंधकांची सुटका न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी इस्रायली सैन्याला गाझा पट्टीच्या आत आणि आजूबाजूला सैन्य जमवण्याचे आदेश पुन्हा एकदा दिले आहेत. ऑपरेशन सुरू आहे आणि लवकरच पूर्ण होईल.”
युद्ध पुन्हा सुरु होणार?
मिळालेल्या माहितीननुसार, सर्व ओलिसांच्या सुटका झाल्याशिवाय युद्विरामासंदर्भात कोणतीही दुसरी चर्चा होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारपर्यंत तीन ओलिसांची सुटका झाली तरच युद्धविराम सुरु राहणार आहे, असे न झाल्यास मध्येपूर्वेत पुन्हा एकदा युद्ध सुरु होण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे युद्धविरामाचा निर्णय आता हमासच्या पुढील कृतीवर अवलंबून आहे.