
Hasina death verdict Awami League vs Yunus govt protests till Nov 30
Awami League Challenges Yunus Govt After Sheikh Hasina Death Sentence : बांगलादेशातील (Bangladesh) राजकीय वातावरण पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याने राजकीय वादळ उठले आहे. ७८ वर्षीय हसीनांच्या अनुपस्थितीत झालेल्या या खटल्यावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हसीना यांना दोषी ठरवण्यात राजकीय हेतू असल्याचा आरोप देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने केला जात आहे.
या निकालानंतर अवामी लीगने सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. या शिक्षेला ‘बनावट, बेकायदेशीर आणि निवडणुकीपूर्वीचा कट’ म्हणत पक्षाने देशभरात आंदोलनांचा बिगुल फुंकला आहे. २५ नोव्हेंबर रोजी पक्षाने जाहीर केले की ३० नोव्हेंबरपर्यंत देशव्यापी मोर्चे, निदर्शने आणि प्रतिकार आंदोलन सुरू राहील. येणाऱ्या निवडणुका ‘फसव्या पद्धतीने’ घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करून अवामी लीगने स्पष्ट केले की ते कोणत्याही परिस्थितीत देशाच्या हिताला धोका होऊ देणार नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : कधीही होऊ शकते युद्ध! Durand Lineवर हालचालींना वेग; पाकिस्तानची आता खैर नाही, सूडाच्या आगीत पटले ‘हे’ देश
पक्षाचा आरोप आहे की नोबेल पुरस्कार विजेते आणि अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे या संपूर्ण प्रक्रियेचे सूत्रधार आहेत. अवामी लीगने सोशल मीडियावरही याबाबत जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यांचा ठाम दावा आहे की हसीना आणि त्यांचा पक्ष आगामी फेब्रुवारीतील निवडणुकांपासून दूर राहावा, यासाठीच न्याय प्रक्रियेचा गैरवापर केला गेला. या संदर्भात पक्षाने युनूस यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
Bangladesh Awami League’s Continuous Programs Demanding the Resignation of Illegal Usurper, Killer–Fascist Yunus and Rejecting the Verdict of the Illegal ICT Tribunal
— Protest, demonstration and resistance marches across all districts and upazilas until 30 November ⸻ Dear… pic.twitter.com/y9KHOJDKaS — Bangladesh Awami League (@albd1971) November 25, 2025
credit : social media
अवामी लीगने देशातील तळागाळातील कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जाहीर केले की देशविरोधी कट, राजकीय छळ आणि लोकशाही प्रक्रियेला धोका देणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना ते तोंड देतील. हसीना समर्थकांचे म्हणणे आहे की ५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर जेव्हा हसीना सरकार उलथवले गेले, त्याच काळात अनेक खोटे आरोप करून माजी पंतप्रधानांवर शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले. हे आरोप केवळ राजकीय सूड म्हणून वापरण्यात येत असल्याचे ते सांगतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RareEarth Alert : चीनच्या ‘रॅकेट’वर EU ची मोठी कारवाई; दुर्लभ खनिजांवरील अवलंबित्व संपवण्यासाठी युरोपचा मोठा निर्णय
या सर्व घटनांमुळे बांगलादेशातील सत्तासंघर्ष गंभीर टप्प्यात पोहोचला आहे. एका बाजूला अंतरिम सरकार देशात स्थैर्य आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचा दावा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला अवामी लीग याला लोकशाहीवरचा प्रहार मानून लढाईला सज्ज झाली आहे. पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की ते बांगलादेशात ‘फसव्या निवडणुका’ होऊ देणार नाहीत आणि आवश्यक असल्यास, कोणत्याही किंमतीत ते अशा कृतीला रोखतील. यातून देशातील राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
Ans: त्यांच्यावर मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचे आरोप ठेवून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शिक्षा सुनावली आहे.
Ans: पक्षाचा दावा आहे की हा न्यायालयीन निकाल राजकीय सूड आणि निवडणूक कटाचा भाग आहे.
Ans: अवामी लीगने ३० नोव्हेंबरपर्यंत देशव्यापी निदर्शने जाहीर केली आहेत.