Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Hindu Murder: बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; नेमकं कारण काय?

Hindu Murder News: पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जमीनदाराने २३ वर्षीय हिंदू तरुण कैलाश कोहलीची गोळ्या झाडून हत्या केली. मोठ्या आंदोलनानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 11, 2026 | 05:20 PM
बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या (Photo Credit- X)

बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पाकिस्तानमध्ये माणुसकीला काळिमा!
  • निवारा बांधल्याच्या रागातून हिंदू तरुणाची गोळ्या झाडून हत्या
  • सिंध प्रांतात तीव्र पडसाद
Pakistan Hindu Murder News: बांगलादेशमध्ये होणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंच्या अत्याचारानंतर आता पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून अल्पसंख्याक हिंदूंवरील अन्यायाची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्याच जमिनीवर निवारा (शेल्टर) बांधल्याच्या रागातून एका मुस्लीम जमीनदाराने २३ वर्षीय हिंदू शेतकरी तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. कैलाश कोहली असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमधील हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे.

जमीनदाराचा क्रूरपणा आणि हत्येचे कारण

ही घटना बादिन जिल्ह्यातील तलहार गावात ४ जानेवारी रोजी घडली. कैलाश कोहली हा जमीनदार सरफराज निजामानी याच्या शेतात कामाला होता. आपली राहण्याची सोय व्हावी यासाठी कैलाशने शेतात एक तात्पुरता निवारा तयार करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आपल्या जमिनीवर हिंदू शेतकऱ्याने निवारा बांधलेला निजामानीला आवडले नाही. याच क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या निजामानीने कैलाशवर थेट गोळ्या झाडल्या. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या कैलाशला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

Pakistan Coup: पाकिस्तानात ‘पाळीव साप’ मालकालाच चावणार? लष्कर-ए-तैयबाचे असीम मुनीर यांना उघड आव्हान; सत्तापालटाची चिन्हे

आंदोलनापुढे प्रशासन झुकले; आरोपी जेरबंद

कैलाशच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ पून कुमार कोहली यांनी पोलिसांत तक्रार (FIR) दाखल केली. मात्र, सुरुवातीला पोलीस कारवाईसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत हिंदू समुदायाने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. शेकडो नागरिकांनी बादिनमध्ये धरणे आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली.

वाढता जनक्षोभ पाहून सिंध पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. एसएसपी (बादिन) कमर रजा जस्कानी यांनी माहिती दिली की, विशेष पथकाने हैदराबादमधील फतेह चौक परिसरातून मुख्य आरोपी सरफराज निजामानी आणि त्याचा साथीदार जफरुल्लाह खान याला शनिवारी रात्री अटक केली.

न्यायाची मागणी आणि असुरक्षिततेची भावना

सिंधमध्ये हिंदू अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या ‘हिंदू वेल्फेअर ट्रस्ट’चे शिव काची यांनी सांगितले की, “हे आंदोलन केवळ न्यायासाठी होते. आयजी (IG) जावेद अख्तर ओधो यांनी स्वतः पीडित कैलाशच्या वडिलांना फोन करून आरोपींच्या अटकेचे आश्वासन दिले, तेव्हाच हे आंदोलन मागे घेण्यात आले.” या प्रकरणात निष्पक्ष सुनावणी व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून पाकिस्तानातील हिंदू सुरक्षित राहू शकतील, अशी भावना समुदायाकडून व्यक्त केली जात आहे.

Viral Video: ‘जर भारत आणि तालिबानला मजा आली नाही तर पैसे परत’; पाकिस्तान लष्कर प्रमुखाला ‘फिल्मीगिरी’ नडली, जगभरात बनले हसे

Web Title: Pakistan hindu youth kailash kohli killed sindh province attack details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Hindu
  • Murder
  • pakistan

संबंधित बातम्या

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी
1

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Pakistan Coup: पाकिस्तानात ‘पाळीव साप’ मालकालाच चावणार? लष्कर-ए-तैयबाचे असीम मुनीर यांना उघड आव्हान; सत्तापालटाची चिन्हे
2

Pakistan Coup: पाकिस्तानात ‘पाळीव साप’ मालकालाच चावणार? लष्कर-ए-तैयबाचे असीम मुनीर यांना उघड आव्हान; सत्तापालटाची चिन्हे

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर
3

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर

Shrabanti Ghosh: ‘बेडवर टेकलेले पाय अन् मानेवर जखम’ बांगलादेशात 12 वर्षीय हिंदू मुलीचा संशयास्पद मृत्यू; दोन संशयित ताब्यात
4

Shrabanti Ghosh: ‘बेडवर टेकलेले पाय अन् मानेवर जखम’ बांगलादेशात 12 वर्षीय हिंदू मुलीचा संशयास्पद मृत्यू; दोन संशयित ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.