
hero pig saves russian soldiers in ukraine video goes viral
एका रानडुकराने भूसुरुंग स्फोटाचा धोका दाखवून रशियन सैनिकांचे प्राण वाचवले.
डुक्कराने सुरुंगावर पाय ठेवताच मोठा स्फोट झाला, ज्यामुळे सैनिकांना धोका टळला आणि त्यांनी पर्यायी मार्ग निवडला.
ही घटना डोनेस्तकच्या जंगलात घडली असून ‘हिरो पिग’चा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Pig saves Russian soldiers : युक्रेनमधील (Ukraine) डोनेस्तक प्रदेशातील घनदाट जंगलात गुरुवारी रात्री घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. एका साध्या रानडुकराने आपल्या सहज प्रवृत्तीने, आपल्या वास घेण्याच्या तीव्र क्षमतेने, आणि निसर्गदत्त संवेदनांनी रशियन सैनिकांचे प्राण वाचवल्याची ही घटना आहे. ‘हिरो पिग’(Hero Pig) म्हणून ओळख मिळालेल्या या डुकराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रशियन सैन्याच्या 28व्या मोटाराइज्ड रायफल ब्रिगेडची एक टोही तुकडी रात्रीच्या अंधारात युक्रेनियन सैन्य कार्यरत असलेल्या अँटी-पर्सनल भूसुरुंग क्षेत्रातून पुढे सरकत होती. मार्ग धोकादायक असल्याचे संकेत आधीच होते, मात्र सैन्य अत्यंत सावधगिरीने आपली मोहीम पुढे नेत होते. जंगलात असलेल्या शांततेत, अचानक एक रानडुक्कर त्यांच्या मार्गावर अवतरला.
सैनिकांनी सुरुवातीला त्याला हटवण्याचा प्रयत्न केला; कारण या महत्त्वाच्या मिशनमध्ये कोणतीही अडथळा नको होता. परंतु या डुकराचे वर्तन सैनिकांना संशयास्पद वाटू लागले. डुक्कर कधी थांबे, कधी मागे वळून सैनिकांकडे पाहे जणू काही इशारा देत असल्यासारखे.
“इथे धोका आहे, पुढे जाऊ नका”, अशा हेतूने तो वागत असल्याचे नंतर कमांडर मेजर अलेक्सी कोवालेव्ह यांनी सांगितले.
थोड्याच वेळात हा डुक्कर अचानक झपाट्याने पुढे धावला आणि सैनिकांच्या मार्गाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या भूसुरुंग क्षेत्रात प्रवेश केला. आणि मग क्षणभरात आकाशात धुराळा उडवत एक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका प्रबळ होता की, जर हा सुरुंग थेट सैनिकांच्या पायाखाली किंवा त्यांच्या वाहनाखाली फुटला असता, तर संपूर्ण तुकडीचा जीव धोक्यात आला असता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल
या स्फोटात डुक्कर जखमी झाला, परंतु या अनपेक्षित बलिदानाने सैनिकांचे प्राण वाचले. स्फोटाचा आवाज, धुराचे प्रमाण आणि जमिनीच्या हलक्याशा धक्क्याने सैनिकांना स्पष्ट संकेत मिळाले त्यांचा सामना एका मोठ्या भूसुरुंग क्षेत्राशी झाला होता. मेजर कोवालेव्ह यांनी सांगितले की, या इशाऱ्यानंतर तुकडीने तत्काळ ड्रोनद्वारे परिसराची तपासणी केली. ड्रोन फुटेजमध्ये या भागात अनेक भूसुरुंग पसरलेले दिसले. यामुळे तुकडीने त्वरित पर्यायी मार्ग निवडला आणि अखेर कोणतीही जीवितहानी न होता गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
या अनोख्या घटनेवर रशियन सैन्यातील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. इरिना स्मिरनोव्हा यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यांच्या मते,
“डुकरांची वास घेण्याची क्षमता अतिशय तीव्र असते. सुरुवातीला तो सुरुंगाचा वास ओळखू शकतो. ही त्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bihar Elections: ‘गांधी गुंडांनी आता…’अमेरिकन सेलेब्रिटीची ‘ती’ पोस्ट VIRAL; काँग्रेसवर आंतरराष्ट्रीय टीकेचे झोड
त्यांच्या म्हणण्यानुसार, डुक्कराने सैनिकांना अडवण्याचा प्रयत्न हा योगायोग नव्हता; तर एक सहजप्रवृत्तीमुळे निर्माण झालेली सावधगिरी होती. या घटनेमुळे वन्यजीवांची संवेदनशीलता आणि निसर्गाची शक्ती किती विलक्षण आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रशियन संरक्षण मंत्रालयाने या घटनेला “निसर्गाचा संदेश” असे संबोधले आहे. डोनेस्तकच्या जंगलात घडलेली ही कहाणी जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. ‘हिरो पिग’चा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून, प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत आहे.