Operation Southern Spear: ट्रम्प यांनी तैनात केले १५,००० सैन्य, कधीही होऊ शकतो व्हेनेझुएलावर हल्ला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाविरोधात लष्करी कारवाईचे संकेत देत १५,००० सैन्य आणि युद्धनौका कॅरिबियनमध्ये तैनात केल्याचे सीएनएनचे वृत्त.
जगातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड कॅरिबियनमध्ये पोहोचल्याने परिस्थिती अतिशय गंभीर.
व्हेनेझुएला देखील मोठ्या प्रमाणात लष्करी चढाओढ करत असल्याने संभाव्य संघर्षाची भीती वाढली.
Trump deploys 15000 troops Venezuela : Operation Southern Spear या अमेरिकेच्या गुप्त लष्करी मोहिमेने पुन्हा एकदा जागतिक राजकारणात हलचल निर्माण केली आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्हेनेझुएलाविरोधात संभाव्य लष्करी कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर सेना, युद्धनौका आणि शक्तिशाली विमानवाहू जहाज कॅरिबियनच्या दिशेने पाठवले आहे. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला राजकीय व सामरिक संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.
सीएनएनच्या मते, पेंटागॉनने आखलेल्या Operation Southern Spear अंतर्गत अमेरिकेने कॅरिबियन समुद्रात तब्बल १५,००० सैन्य, एक डझनहून अधिक युद्धनौका, क्रूझर्स, विनाशक, हल्ला पाणबुडी आणि उभयचर युद्धनौका तैनात केल्या आहेत. या संपूर्ण तैनातीचा उद्देश संभाव्य हल्ल्यापूर्वी लष्करी उपस्थिती मजबूत करणे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bihar Elections: ‘गांधी गुंडांनी आता…’अमेरिकन सेलेब्रिटीची ‘ती’ पोस्ट VIRAL; काँग्रेसवर आंतरराष्ट्रीय टीकेचे झोड
या तणावपूर्ण परिस्थितीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड या जगातील सर्वात मोठ्या विमानवाहू जहाजाची कॅरिबियनमध्ये तैनाती. या जहाजामुळे अमेरिकेची रणनीतिक क्षमता कितीतरी पटीने वाढते.
हे जहाज फक्त शक्ती प्रदर्शन नव्हे, तर थेट लष्करी कारवाईची प्रत्यक्ष तयारी सूचित करत असल्याचे संरक्षण विश्लेषक म्हणत आहेत.
या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये सलग अनेक उच्चस्तरीय बैठकांनी चर्चा तापली. अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना हटवण्याच्या विविध पर्यायांची माहिती दिली.
एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले:
“मी माझा निर्णय घेतला आहे. तो काय आहे हे मी सांगू शकत नाही, पण हो… निर्णय घेतलाय.”
‘I Have Mostly Made Up My Mind’:Trump Chooses Path on Venezuela,Declines to Inform the Press,as Dept of War Initiates‘Operation Southern Spear’ Pete Hegseth Declares the Start of ‘SOUTHERN SPEAR’2 Safeguard ‘America’s Neighborhood’ pic.twitter.com/foBH6hvXL4pic.twitter.com/7ysUZGA7tB pic.twitter.com/E2S7XPYPQm — Sandy (@SD73660) November 16, 2025
credit : social media
या विधानामुळे तणाव अधिकच वाढला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अभूतपूर्व घटना! ‘हि’ अशी कोणती परीक्षा आहे ज्यासाठी ‘या’ देशाने चक्क रद्द केली 140 विमान उड्डाणे
सीएनएनच्या सूत्रांनुसार, संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि जनरल डॅन केन यांच्या उपस्थितीत ट्रम्पना खालील पर्याय दाखवले गेले –
व्हेनेझुएलाच्या लष्करी तळांवर अचूक हवाई हल्ले
सरकारी इमारती आणि कमांड सेंटर्स लक्ष्य करणे
ड्रग्ज तस्करी मार्गांवर हल्ले
आणि अगदी मादुरो यांना थेट लक्ष्य करण्याचाही पर्याय
हे पर्याय सुचवल्यानंतर लष्करी तैनाती अधिक वेगाने वाढवण्यात आली.
अमेरिकेच्या हालचाली पाहताच व्हेनेझुएलाने देखील मोठ्या प्रमाणात लष्करी सज्जता जाहीर केली आहे. युद्धसामग्री, क्षेपणास्त्र प्रणाली आणि हजारो सैनिक रणनीतिक ठिकाणी हलवण्यात आले आहेत. ज्ज्ञांच्या मते, दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या या लष्करी चढाओढीमुळे संभाव्य युद्धाचा धोका अधिकच वाढला आहे.
आंतरराष्ट्रीय राजकीय निरीक्षकांच्या मते, ही स्थिती जगासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढल्यास संपूर्ण लॅटिन अमेरिकेत अस्थिरता निर्माण होऊ शकते. आता सगळ्यांचे लक्ष एका गोष्टीकडे ट्रम्प त्यांच्या घेतलेल्या “निर्णया”ची घोषणा कधी करतात?






