Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: सायप्रस ते इस्रायल धुरांचे लोट! इराणच्या ‘प्रतिनिधी’ गॅंगने जगाला वेढलं; सायप्रसमधील UK हवाई तळांवरही ड्रोन हल्ले

Hezbollah: इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्युनंतर मध्य पूर्व तीव्र तणावाच्या काळातून जात आहे. इराणने इस्रायल तसेच संपूर्ण मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणात हल्ले केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 02, 2026 | 10:37 AM
hezbollah attack on israel and cyprus uk airbase iran war updates starmer trump

hezbollah attack on israel and cyprus uk airbase iran war updates starmer trump

Follow Us
Follow Us:
  • हिजबुल्लाहची युद्धात उडी
  • ब्रिटनची अमेरिकेला साथ
  • मध्यपूर्वेत भीषण स्फोट

Hezbollah rocket attack on Israel March 2026 : मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता इराण आणि इस्रायलच्या सीमा (Iran-Israel War) ओलांडून संपूर्ण प्रदेशात पसरली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचा सर्वात मोठा ‘प्रॉक्सी’ गट मानल्या जाणाऱ्या हिजबुल्लाहने अधिकृतपणे युद्धात उडी घेतली आहे. हिजबुल्लाहने (Hezbollah )उत्तर इस्रायलमधील हैफा शहरावर रॉकेटचा पाऊस पाडला असून, दुसरीकडे सायप्रसमध्ये असलेल्या ब्रिटनच्या अक्रोटिरी (Akrotiri) हवाई तळावरही ड्रोन हल्ला चढवला आहे. या घटनेमुळे आता ब्रिटन आणि इतर युरोपीय देशही थेट या युद्धाच्या खाईत ओढले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिजबुल्लाहचा ‘सूडाचा’ प्रहार आणि सायप्रसवर हल्ला

लेबनीज सशस्त्र गट हिजबुल्लाहने दावा केला आहे की, त्यांनी हैफा शहराच्या दक्षिणेकडील इस्रायली क्षेपणास्त्र संरक्षण केंद्रावर अचूक मारा केला आहे. नोव्हेंबर २०२४ मधील युद्धबंदीनंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. विशेष म्हणजे, सायप्रसमधील ब्रिटीश लष्करी तळावर झालेला ड्रोन हल्ला जगाला धक्का देणारा आहे. ब्रिटनने इराणविरुद्धच्या कारवाईसाठी अमेरिकेला आपले तळ वापरण्याची परवानगी दिल्याचा हा बदला असल्याचे हिजबुल्लाहने सुचवले आहे. अक्रोटिरी तळ हा मध्यपूर्वेतील ब्रिटनचा सर्वात महत्त्वाचा लष्करी अड्डा आहे, जिथे मध्यरात्रीच्या सुमारास स्फोटक ड्रोनने धडक दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO

ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचा मोठा निर्णय

ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे जाहीर केले की, त्यांनी इराणविरुद्धच्या ‘बचावात्मक’ हल्ल्यांसाठी अमेरिकेला ब्रिटीश लष्करी तळांचा वापर करण्याची मुभा दिली आहे. स्टारमर म्हणाले की, “ब्रिटिश नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आणि इराणला निष्पाप लोकांचा बळी घेण्यापासून रोखण्यासाठी हा कठीण निर्णय घेण्यात आला आहे.” ब्रिटनच्या या निर्णयामुळे इराण अधिकच संतापला असून, त्याचे परिणाम आता ब्रिटीश मालमत्तांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या रूपाने दिसत आहेत.

Israel has carried out heavy strikes in the southern suburbs of Lebanon’s capital Beirut after Hezbollah launched an attack on northern Israel in retaliation for the killing of Iran’s Supreme Leader Ali Khamenei. pic.twitter.com/px1KXxTRi2 — Al Jazeera English (@AJEnglish) March 2, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलचे प्रत्युत्तर: बेरूतमध्ये धुराचे लोट

हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) क्षणार्धाचाही विलंब न लावता लेबनॉनवर आक्रमण केले. लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील भागात इस्रायलने भीषण हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या वरिष्ठ कमांडर्सना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. बेरूतच्या आकाशात सध्या काळ्या धुराचे लोट दिसत असून, इस्रायलने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत हिजबुल्लाहचा धोका पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील.

Yes, reports confirm a small drone struck the airfield at RAF Akrotiri (UK base in Cyprus) around midnight local time last night. Cyprus Mail sources say no casualties, minor damage only. Base declared security threat; personnel told to shelter in place amid possible further… — Grok (@grok) March 2, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Noor Khan Airbase: पाकिस्तानमध्ये आणीबाणी! Pakistan हवाई दलाचा प्रमुख हवाई तळ जाळून खाक; तालिबानचा सर्वात मोठा प्रहार

कुवेतमध्ये अमेरिकन सैनिकांचा मृत्यू आणि ट्रम्प यांचा दावा

दुसरीकडे, कुवेतमध्ये झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात ३ अमेरिकन सैनिक मारले गेले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे अमेरिकेतील राजकारणही तापले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेने आतापर्यंत ४८ इराणी नेत्यांना यमसदनी धाडले आहे. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, इराणच्या नवीन नेतृत्वाने चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे, मात्र जोपर्यंत अमेरिकेचे ‘अंतिम ध्येय’ साध्य होत नाही, तोपर्यंत हल्ले थांबणार नाहीत. तेहरानमधील खामेनी यांचे कार्यालय यापूर्वीच अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात जमीनदोस्त झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिजबुल्लाहने सायप्रसमधील ब्रिटीश तळावर हल्ला का केला?

    Ans: ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी अमेरिकेला इराणविरुद्ध हल्ले करण्यासाठी आपल्या तळांचा वापर करण्याची परवानगी दिली, त्याचा बदला म्हणून हा ड्रोन हल्ला करण्यात आला.

  • Que: कुवेतमध्ये काय घडले आणि किती अमेरिकन सैनिक मारले गेले?

    Ans: इराणने कुवेतमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ३ अमेरिकन सैनिक ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Que: हिजबुल्लाहने इस्रायलमध्ये कोणत्या भागाला लक्ष्य केले आहे?

    Ans: हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमधील हैफा शहराच्या दक्षिणेकडील क्षेपणास्त्र संरक्षण केंद्रावर रॉकेट हल्ला केला आहे.

Web Title: Hezbollah attack on israel and cyprus uk airbase iran war updates starmer trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • britain
  • Hezbollah
  • Iran Israel Conflict
  • Iran Vs America
  • Iran-Israel War
  • World War 3

संबंधित बातम्या

Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान
1

Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान

Saudi-Yemen Conflict : हुथी बंडखोरांचा सौदीला मोठा धक्का; मोचा शहरावर ताबा मिळवत बाब अल-मंदेबकडे कूच
2

Saudi-Yemen Conflict : हुथी बंडखोरांचा सौदीला मोठा धक्का; मोचा शहरावर ताबा मिळवत बाब अल-मंदेबकडे कूच

UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ
3

UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ

Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य
4

Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.