Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spain हादरलं! दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक, 70 हून अधिक जखमी, थरारक VIDEO

Spain Train Accident : स्पेनमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक झाली आहे. या अपघाताने संपर्ण स्पेन हादरले असून याचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 19, 2026 | 11:27 AM
spain train accident

spain train accident

Follow Us
Close
Follow Us:
  • स्पेनमध्ये दुर्वैवी घटना
  • दोन हाय-स्पीड ट्रेनची भीषण धडक
  • 70 हून अधिक जखमी
Spain Train Accident : मद्रिद : स्पेनमध्ये रविवारी (18 जानेवारी 2026) एक दुर्दैवी घटना घडली आहे. दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक झाली आहे. ट्रेन एकमेकांमध्ये घुसल्या असून या धडकेत 21 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 70 हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या ट्रेन अपघाताने (Train Accident) संपूर्ण स्पेन हादरला आहे.

थायलंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; धावत्या ट्रेनवर कोसळली भलीमोठी क्रेन, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण स्पेनमध्ये कोर्डोबा प्रांतात अदामुझ परिसरात हा अपघात घडला आहे. मालागाहून माद्रिदला जाणारी एक हाय-स्पीड ट्रेन रुळावरुन घसरली आणि दुसऱ्या लाईनवरील ट्रेनला जाऊन धडकली. ज्यामुळे जोरदार अपघात झाला असून ट्रेन एकमेकांमध्ये घुसल्या आहेत. या अपघाताने ट्रेनचा चक्काचूर झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

अपघाताचे कारण अस्पष्ट

प्राथमिक तपासांनुसार, मालागाहून माद्रिदला जाणारी ट्रेन रुळावरुन घसरुन दुसऱ्या लाईनवरील ट्रेनला धडकली. परंतु ट्रेन रुळावरुन नेमकी कोणत्या कारणामुळे घसरली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. परंतु ट्रेनच्या जोरदार धडकेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये सुरुवातीला पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती, परंतु हा आकडा वाढून 21 वर पोहचला आहे. तसचे याची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय 73 जण या अपघातात जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या अनुभव

प्रत्यक्षदर्शींनीनी या अपघाताचे भयावह म्हणून वर्ण केले असून ट्रेनचा एक डबा पूर्णपणे उलटला असल्याचे म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मोठ्या संख्येने रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके आणि अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले होते. या अपघाताने काही क्षणांसाठी भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शनींनी सांगितले.

या अपघातामुळे माद्रिद आणि कॉर्डोबा, सेव्हिल, मालागा आणि हुएला या प्रमुख अँडालुसियन शहरांमध्ये हाय-स्पीड रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. सध्या ट्रेनचा डबा, धातूचे तुकडे, खिडक्यांच्या काचा हटवण्याचे कार्य सुरु आहे. याच वेळी रेल्वे प्रशासनाने पीडीतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी विशेष केंद्रही सुरु केला आहे. तसेच रॉयल पॅलेसनेही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

High speed rail crash in Spain. It’s reported 5 dead so far. Awful. pic.twitter.com/JuHux8uyrP — Bernie (@Artemisfornow) January 18, 2026

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्पेनमध्ये कुठे घडला ट्रेन अपघात?

    Ans: दक्षिण स्पेनमध्ये कोर्डोबा प्रांतात अदामुझ परिसरात हा अपघात घडला आहे.

  • Que: स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेन अपघातात किती जीवितहानी झाली?

    Ans: स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेन अपघातात 21 जणांचा मृत्यू आणि 73 लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

  • Que: स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेन अपघात कसा घडला?

    Ans: स्पेनमध्ये मालागाहून माद्रिदला जाणारी एक हाय-स्पीड ट्रेन रुळावरुन घसरली आणि दुसऱ्या लाईनवरील ट्रेनला जाऊन धडकली. ज्यामुळे जोरदार अपघात झाला.

Web Title: High speed train crash in southern spain at least 21 killed in accident video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Train Accident
  • World news

संबंधित बातम्या

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO
1

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय
2

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा
3

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी
4

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.