Hindu women allegedly assaulted in Bangladesh
Bangladesh News Marathi : ढाका : सध्या बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या एप्रिल २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूका घेण्यावरुन तीव्र विरोध सुरु आहे. अशातच आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बांगलादेशात पुन्हा एक हिंदू समुदायावर हल्ला झाला आहे. बांदलादेशात एका हिंदू तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. या घटनेवर देशभर हिंदू समुदायात संताप व्यक्त केला जात आहे. हिंदू समुदायाकडून न्यायाची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशाच्या कुमिल्ला जिल्ह्यातील मुरादनगर भागात ही संतापजनक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय हिंदू तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. २१ वर्षीय तरुणी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी हरिसेवा च्या धार्मिक उत्सावानिमित्त बांगलादेशात आली होती. या उत्सवादरम्यान ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीला चाकूचा धाक दाखवत तिच्या घरात घुसून जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. याचा व्हिडिओ देखील आरोपीने बनवला. तसेच पीडीतेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला पोलिसांमध्ये तक्रार केले तर ठार मारले जाईल अशीही धमकी पीडीतेला देण्यात आली.
ढाकाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) पक्षाच्या एका नेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने केवळ पीडीतेचे शोषण केले नाही, तर या घटनेचा व्हिडिओ देखील बनवला होता असे पोलिसांनी म्हटले. पीडीतेचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन व्हायरल केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेने बांगलादेशाच्या कुमिल्लात लोकांमध्ये तीव्र संताप आहे. लोक रसत्यावर उतरले आहेत. तसेच आरोपींवरोधात कठोर कारवाईची मागणी केली जाते. संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून न्यायाची मागणी होता आहे.
काही दिवसांपूर्वीच पुन्हा एक हिंदू समुदायाच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आली होती. यावरुन हिंदू समुदायामध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. अशात लैंगिक शोषणाच्या या घटनेने हा संताप अधिक तीव्र झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा बांगलादेशात भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभारले जात आहे. हिंदूंसोबतच, अहमदिया, मुस्लिम, बौद्ध धर्माच्या लोकांवरही अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सध्या बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे.