Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या एका दिवसात सलग तीन व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये कतार आणि सौदी अरेबियाच्या जहाजांचा समावेश आहे. कतारच्या जहजावरील हल्ल्यातून भारतीय थोडक्यात बचावले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 09:09 AM
Hormuz attack

Hormuz attack

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये तणाव वाढला
  • सलग तीन व्यापारी जहाजांवर हल्ले
  • कतारच्या जहाजवरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय
Hormuz Attacks News in Marathi : ओमानच्या आखाताजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. कतारहून भारताकडे निघालेल्या एका LNG जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावरील २९ कर्मचाऱ्यांपैकी चार भारतीय असून सर्वजण सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

Hormuz Ship Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! दोन जहाजांवर भीषण मिसाइल हल्ला; अमेरिकेचा थेट इराणवर आरोप

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, AL REKAYYAT हे जहाज कतारमधील रास लाफान बंदरावरुन द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) घेऊनगुजरातच्या दहेज बंदराकडे रवाना झाले होते. या वेळी होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवास करत असताना अचाकन जहाजाला ड्रोनने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रुममध्ये आग लागली आणि धुरोचे लोट दिसले. परंतु जहाजावरील कर्मचाऱ्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थछ टळला.

कोणतीही जीवित किंवा वित्त हानी नाही

मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजावर ४ भारतीयांसह २९ क्रू मेंबर्स होते. हे सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच जहाजारील मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य

गेल्या एका दिवसात होर्मुझ परिसरात सलग तीन जहाजांना लक्ष्य करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कतारच्या जहाजासह सौदी अरेबियाशी संबंधित जहाजाचा समावेश आहे.

तसेच या हल्ल्यांपूर्वी सोमवारी, ०५ जुलै रोजी देखील ओमानच्या लिमाह किनाऱ्याजवळ एका जहाजाला लक्ष्य करण्यात आले होते. याचा आरोप अमेरिकेने थेट इराणवर केला होता.होर्मुझमधील वाढत्या हल्ल्यांमुळे समुद्री व्यापार मार्गाच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

कतार आणि सौदी अरेबियाचा तीव्र निषेध

या घटनेसाठी देखील इराणला जबाबदार धरण्यात आले असून कतार आणि सौदी अरेबियाने तीव्र निषेध केला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या उपराजदूतांना बोलावनू या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच अधिकृत निषेधपत्रही जारी करण्यात आले.

याशिवाय सौदी अरेबियाने या हल्ल्यांना तीव्र विरोध केला आहे. अशा कारवाया तातडीने थांबवण्याची मागणी सौदी अरेबियाने केली आहे. तसेच अमेरिकेनेही याचा निषेध नोंदवला आहे. परंंतु सध्या इराणकडून या हल्ल्यांबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

भारतासाठी का महत्त्वाचे?

होर्मुझ सामुद्रधुनी भारताच्या उर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि LNG आयात या मार्गावरुन करतो. यामुळे या भागात तणाव वाढल्यास भारताच्या उर्जा पुरवठा आणि इंधन पुरवठ्या परिणाम होऊ शकतो. यामुळे इंधनांच्या किमती देखील वाढू शकतात.

Ministry of Foreign Affairs Summons Iran’s Deputy Ambassador, Delivers Protest Note Over Targeting of Qatari Tanker Al Rekayyat Doha | July 7, 2026 The State of Qatar expressed its strong condemnation and denunciation of the targeting of the Qatari tanker Al Rekayyat while it… pic.twitter.com/f8wuU3kMv6 — Ministry of Foreign Affairs – Qatar (@MofaQatar_EN) July 7, 2026


PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश

Web Title: Hormuz attacks three ships targeted indians safe qatar lng ship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Saudi Arabia
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
1

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
2

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
3

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
4

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.