Hormuz Ship Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! दोन जहाजांवर भीषण मिसाइल हल्ला; अमेरिकेचा थेट इराणवर आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ब्रिटनच्या यूके मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (०५ जुलै) ओमानच्या लिमाह किनाऱ्याजवळ दोन जहाजांवर अज्ञात क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गट किंवा बंडखोरांनी घेतलेली नाही.
या हल्ल्यांचा आरोप इराणवर करण्यात आला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) ने होर्मुझ सामुद्रधुनीत दोन क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये एका तेलवाहू आणि एका व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आले. यामुळे जहाजांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप इराणकडून या दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात निधन झाले होते. ०४ जुलै रोजी त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने लोक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित आहे. अशा भावनिक परिस्थिती अमेरिकेने केलेल्या या आरोपांमुळे राजकीय आणि लष्कतरी तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
सध्या या हल्ल्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर जहाजांवर लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. अमेरिकेच्या आरोपानंतर संपूर्ण जगाचे लक्ष्य इराणच्या उत्तराकडे लागले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन दररोज मोठ्या प्रमाणात कच्चा तेलाची आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. या भागात तणाव निर्माण झाल्यास त्याचा जागतिक बाजारावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. याचा जगभरातील अनेक देशांना आर्थिक फटकाही बसू शकतो.
A tanker traveling off the coast of Oman in the Strait of Hormuz has caught on fire after being struck by a projectile. No one immediately claimed responsibility for the attack, though Iran is suspected of attacking at least two other vessels in the area in recent days.… — The Associated Press (@AP) July 7, 2026






