Horrific accident in central Nigeria after fuel tanker explodes At least 70 dead
अबूजा: उत्तर-मध्ये नाजेरियात एक भीषण दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नायजर प्रांतातील सुलेजा भागात एका टॅंकरमध्ये भीषण स्फोट झाला असून यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपात्कालीन व्यवस्थापन एजन्सी (NEMA) ने दिलेल्या माहितीनुसार, जनरेटरच्या मदतीने एका टँकरमधील गॅसोलीन दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला जात असताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेत गॅसोलीन ट्रान्सफर करणाऱ्या आणि जवळ उभ्या असलेल्या अनेक लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून सध्या बचावकार्य सुरू आहे.
नायजरियाचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी दुख: व्यक्त केले
नायजरियाचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी एका निवेदनात या घटनेबद्दल आपले दुख: व्यक्त करत ही घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले. त्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, डिक्को भागातील अनेक रहिवासी टँकरमधून इंधन काढण्याचा प्रयत्न सुरु असताना अनेकजण आगीत आडकले. चॅंकरच्या जवळ अलेलेल जिवंत जळून मृत्यूमुखी पडले, तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. गव्हर्नर बागो यांनी या दुर्दैवी घटनेला चिंताजनक म्हणत, अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
अपघातात 70 जणांचा मृत्यू
नायजेरियाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत किमान 70 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नायजेरियात असा प्रकारच्या पेट्रोल चॅंकरच्या स्पोटाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यामुळे मोठी जीवितहानी होत असून देशभरात शोककाळ पसरलेला आहे.
याआधी सप्टेंबरमध्येही अशाच प्रकारच्या घटनेत 48 लोकांचा मृत्यू झाला होता. नायजेरियामध्ये सध्या आर्थिक परिस्थीतीत कठीण आहे. लोक गरजेसाठी धोकादायक कामे करत आहेत. तसेच गळालेल्या टॅंकरमधून गॅसोलीन चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहे. या घटना थांबवण्यासाठी वाहतूक नियम अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.
वाहतूक सुरक्षेसंबंधी पुनरावलोकन करण्याचे राष्ट्रपतींचे आश्वासन
नायजेरियाचे राष्ट्रपती बोला टीनुबू यांनी ऑक्टोबरमध्ये इंधन वाहतूक सुरक्षेसंबंधी प्रोटोकॉल पुनरावलोकन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस सुरक्षा वाढवणे, सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आणि महामार्ग सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्याचे निर्देश दिले होते. ही घटना नायजेरियासाठी आणखी एक मोठा धक्का असून, स्थानिक प्रशासन आणि मानवीय संस्था सामान्य स्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा दुर्घटनांमुळे भविष्यात सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे.